‘…म्हणून जय दुधानेवर लोक हसत आहेत, त्याने केलाच आहे असला कांड, जाणून घ्या प्रकरण

‘…म्हणून जय दुधानेवर लोक हसत आहेत, त्याने केलाच आहे असला कांड, जाणून घ्या प्रकरण

मराठी बिग बॉसमध्ये स्टायलिश स्पर्धक असलेला जय दुधाने हा नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉस हा शो 19 सप्टेंबर रोजी सुरु झाला. पहिल्याच दिवशी या शोमध्ये स्पर्धेत मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. जय दुधाने याने पलंगावर टॉवेल ठेवला होता.

त्यावर मीराने जय याला त्याला चांगलेच खडसावले. बाथरूम मधल्या वस्तू बाथरूम मध्ये ठेवत जा, तो टावेल धुवायला टाक असे म्हणते. पण जय दुधाने तिचे काही ऐकत नाही. हा टॉवेल चांगला आहे आणि मी हा टॉवेल इथेच ठेवणार असे म्हणतो. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर या दोघांचे चांगले भांडण झाले.

बिग बॉसच्या शोमध्ये जय दुधाने हा एकमेव असा शर्टलेस स्पर्धक आहे. तो अनेक वेळी अंगावर कपडे ठेवत नाही. त्याची बॉडी अतिशय सिक्स पॅक अशी आहे. त्यामुळेच तो अंगावर कपडे ठेवत नसल्याची टीका देखील आता प्रेक्षक करू लागले आहेत. तसेच या शोमध्ये महिला स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत.

त्यामुळे महिलांसमोर असे अंगप्रदर्शन करणे योग्य नाही, अशी टीका देखील अनेकांनी केली आहे. या शो च्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये जय दुधाने याने गायत्री दातारच्या सोबत गप्पा करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या खाजगी बाबींबाबत देखील गायत्री सोबत बोलताना मोठा खुलासा केला आहे.

तसेच त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेल्या संकटाचा सामना कशा प्रकारे केला तिला याबाबतही त्याने सांगितले आहे. त्याच बरोबर मी माझ्या आयुष्यात आजवर पाच मुलींना डेट केले आहे, असे देखील त्याने सांगितले आहे. यातील माझे पहिले अफेअर पाचवीत असताना झाले होते, असे देखील त्याने गायत्री दातारला सांगितले.

त्याच्या या वक्तव्यावरून देखील प्रेक्षकांनी त्याला चांगलच ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. बिग बॉसच्या घरात मध्ये नेहमीच टास्क देण्यात येतात. या टास्क मध्ये जो कोणी जिंकेल त्याला विशेष बक्षीस देखील देण्यात येते. या शोमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील ही सहभागी झाली होती.

मात्र, सहभागी झाल्याचा काही दिवसानंतरच तिला अनेकांची टीका सहन करावी लागली. या प्रचंड टीकेमुळे ती आजारी पडली की काय, असेही सांगण्यात येत आहेत. त्यानंतर बिग बॉस महेश मांजरेकर यांनी तिला काही दिवस वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देऊन बिग बॉसच्या घराबाहेर राहण्याचे सांगितले. त्यानुसार तिने उपचार देखील घेतले.

मात्र, अनेक दिवस उपचार केल्यानंतरही तिची प्रकृती काही सुधारत नव्हती. त्यामुळे तिने देखील लोक असे व्हिडिओ शेअर करून मी हा शो सोडत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सोनाली पाटील, विशाल निकम, सुरेखा कुडची यांचे तिने आभार देखील मानले आहेत. महेश मांजरेकर यांनी तिला सांगितले की, तू हा शो करू शकली असतीस.

मात्र, स्वतः शो सोडण्याचा निर्णय घेतला आहेस, तर तुझा निर्णय योग्य असेल असे ते म्हणाले. या शोमध्ये स्नेहा वाघ आणि तिचा घटस्फोटित पती अविष्कार दारव्हेकर हा सहभागी झाला आहे. या दोघांची देखील या शोमध्ये खूप चर्चा होत असते. अलीकडे जय दुधाने याच्या अंगावर पांढरा रंग टाकण्यात आला होता.

पांढरा रंग टाकण्यात आल्यानंतर याचे देखील सोशल मीडियावर अनेकांनी मीम्स तयार केले. अनेकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले, तर आपल्याला जय हा आवडतो का? आम्हाला नक्की सांगा काय

Team Hou De Viral