तसे झाले नसते तर आज ऐश्वर्या रॉय नव्हे तर, ही अभिनेत्री बच्चन कुटुंबाची सून झाली असती

अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी नेहमीच हे मान्य केले आहे की त्यांच्या घरात ज्या ही घर नेहमीच बॉस राहिलेली आहे. जयाने जेजे सांगितले आहे ते घरातील सर्वांनाच पाळावे लागते. परंतु ऐश्वर्या रॉय आणि करिश्मा कपूरच्या आधी बच्चन परिवाराची होणारी सून ही दुसरीच कोणीतरी होती, पण जया आणि तिच्यात असे काहीतरी घडले की अभिषेक आणि होणाऱ्या सुनेत मोठा दुरावा आला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. चला तर नेमकं असे काय घडले त्याबद्दल जाणून घेऊया.
वास्तविक ऐश्वर्या आणि करिश्मा च्या आधी राणी मुखर्जी ही बच्चन परिवाराची होणारी सून होती. अभिषेक आणि राणी यांनी बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ह्या दोघांनी चित्रपट युवा आणि बंटी और बबलीसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले आहे. लोकांनाही या दोघांची जोडीही खूप आवडली होती आणि जया बच्चनला देखील राणी आवडू लागली होती. ‘युवा’ चित्रपटाच्या रिलीजनंतर अभिषेक आणि राणी सर्वोत्कृष्ट ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक मानले जात होते. या जोडीला ‘बंटी और बबली’ या व्यावसायिक ब्लॉकबस्टर चित्रपटाने एकत्र ठेवले होते.
परस्पर मतभेदांमुळे नाते संपुष्टात आले
बातम्यांच्या आधारे तर जया बच्चन यांनी सुरुवातीला राणी मुखर्जी आणि अभिषेक यांच्या नात्यास सहमती दर्शविली कारण राणी जया प्रमाणेच बंगाली होती. जया बच्चन, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांना जेव्हा ‘लगा चुनरी में डाग’ साठी एकत्र कास्ट केले गेले तेव्हा जया आणि राणी या दोघींमध्ये सेटवर काही तणाव निर्माण झाला होता आणि वादविवादही झाला होता. आणि त्याच्याच अभिषेक आणि राणीच्या नात्यावर परिणाम झाला.
दोघींनी एकमेकांशी संवाद न साधता चित्रपटाचे शूट पूर्ण केले होते. अभिषेक आणि राणीच्या नात्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर जेव्हा राणीचे कुटुंबीय बच्चनबरोबर तिच्या लग्नाची चर्चा करायला गेले , तेव्हा जयाने राणीबद्दल असे काही म्हंटले होते की, जे राणी सहन करू शकली नाही. त्यानंतर जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नात राणीला आमंत्रित केले गेले नाही तेव्हा दोन कुटुंबांमधील तणाव लक्षणीय वाढल्याचे स्पष्ट झाले.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.