ही आहे अभिनेते जयवंत वाडकर यांची ‘ग्लॅमरस’ कन्या, पाहा तिचे हे खास फोटो

ही आहे अभिनेते जयवंत वाडकर यांची ‘ग्लॅमरस’ कन्या, पाहा तिचे हे खास फोटो

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते जयवंत वाडकर यांना आज सर्वच मराठी प्रेक्षक ओळखतात. मुंबईतील गिरगाव येथे जयवंत वाडकर लहानाचे मोठे झाले. एका कोळी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मासेमारी करायचे.

जयवंत वाडकर यांनी 1988 मध्ये ‘तेजाब’ या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर मराठीत त्यांनी 1988 मध्येच एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातून ते मराठी चित्रपटसृष्टीत आले. आतापर्यंत त्यांचे मराठीत 100 हून अधिक तर हिंदीत 45 हून अधिक चित्रपट रिलीज झाले आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरही त्यांनी भरपूर काम केले आहे.

जयवंत वाडकरांप्रमाणेच मुलीने केली अभिनय क्षेत्राची निवड…

खरं तर बॉलिवूडमध्ये आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्याचा ट्रेंड तसा जुनाच. आता हाच ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर, दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, उदय टिकेकरांची कन्या स्वानंदी टिकेकर, मोहन गोखलेंची कन्या सखी गोखले यांनी अभिनय श्रेत्रात पदार्पण केले.

जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. 8 मे 1995 रोजी जन्मलेल्या स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या ‘एफ यू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केेले आहे. आता लवकरच ती सचिन पिळगावकर यांच्या ‘ये है आशिकी’ या चित्रपटात झळकणार आहे.

पत्नी आहे प्राध्यापिका – जयवंत वाडकर यांच्या पत्नीचे नाव विद्या नाईक आहे. विद्या या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्या प्राध्यापिका आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral