‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीपचा सख्खा भाऊ आहे अभिनेता

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीपचा सख्खा भाऊ आहे अभिनेता

टीव्ही मालिका किंवा चित्रपट यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंब किंवा त्यांचे भाऊ, बहीण हे नेमके काय करत असतात, याबद्दल अनेकांना माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. अनेक अभिनेता व अभिनेत्री असे आहेत की, जे चित्रपट सृष्टीमध्ये काम करतात. यामध्ये अजय -अतुल यांची आपल्याला नाव घेता येईल. त्याचप्रमाणे गौतमी देशपांडे, मृण्मयी देशपांडे यांचे देखील आपल्याला नाव घेता येईल. आज आम्ही आपल्याला अशाच एका अभिनेत्याबद्दल माहिती देणार आहोत. त्याचा भाऊ पण अभिनेता आहे.

“सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेत नेहमीच गौरीसाठी आव्हाने समोर असतात. शालिनी वाहिनी आणि देवकी वहिनी या गौरी साठी काही ना काही कारस्थाने करून तिला शांततेने तिचं आयुष्य जगू देत नसतात. प्रत्येक वेळी केलेले कारस्थान जयदीपला समजतात आणि जयदीप प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या गौरीला नेहमीच मदत करत असतो. या मालिकेत सध्या नवीन वळण आले आहे.

जयदीपच्या मनात गौरी विषयी प्रेम निर्माण झाले आहे. तो आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गौरीला एक पत्र लिहितो. पण शालिनी वहिनी ज्योतिका व देवकी हे पत्र बदलतात. ज्योतिका आपल्यावर जयदीप प्रेम करतो, असे पत्र मला जयदीप ने दिले आहे, असे गौरीला दाखवते. सात दिवसांची पैज लागलेली असते. त्यातल्या पहिल्या दिवशीच ज्योतिका जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करते.

गौरी विरुद्ध ज्योतिका, शालिनी आणि देवकी अशीच सात दिवसांची पैज लागली आहे. सात दिवसात गौरीला ज्योतिका घराबाहेर काढणार असे सांगते. याबद्दल जयदीप आणि बाकीच्या घरच्यांना सांगायचे नाही, असे ठरते. जयदीप हा आता गौरी वर प्रेम करत आहे, असे तिला जाणवते. तसेच आपल्यासाठी गौरीच योग्य आहे असे त्याला वाटते. जयदीपला या मालिकेत दोन मोठे भाऊ आहेत.

त्याचप्रमाणे वास्तव जीवनात ही त्याला एक सख्खा भाऊ आहे. चला तर मग जाणून घेऊयात जयदीप चा सख्खा भाऊ कोण आहे ते. जयदीप म्हणजेच मंदार जाधव चा सख्खा भाऊ हिंदी मालिकांमध्ये काम करतो. मंदारच्या भावाचे नाव मेघन जाधव असे आहे. तो हिंदी मालिकांमध्ये अभिनेता आहे.

सोनी टीव्हीवर “विघ्नहर्ता गणेश” मध्ये माधवदासाची भूमिका मेघने केली आहे. “तेरा यार हू मै”, “राधा कृष्ण” , “शुभारंभ”, “तेनालीरामा”, “सीआयडी”, “क्राइम पेट्रोल”, “सावधान इंडिया” ,”अल्लादिन” अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनेता म्हणून त्याने काम केले आहे. तसेच चित्रपटात देखील त्याने काम केले आहे.

मेघनची पत्नीदेखील अभिनेत्री आहे. त्याच्या पत्नीचे नाव मितिका शर्मा जाधव आहे. तिनेदेखील “देवों के देव” या मालिकेत काम केले आहे.

Team Hou De Viral