‘तारक मेहता..’ मधल्या मिसेस सोडीने या प्रसिद्ध बॉलीवूड स्टार सोबत केलय काम, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

‘तारक मेहता..’ मधल्या मिसेस सोडीने या प्रसिद्ध बॉलीवूड स्टार सोबत केलय काम, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

‘तारक मेहता का उलटा चष्मा सब टीव्हीवर प्रसारित होणार शो गेल्या १२ वर्षांपासून लोकांच्या आवडीचा विषय बनला आहे. केवळ शोच नाही तर त्याच्या कलाकारांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते. या शोची बरेच पात्रे इतकी लोकप्रिय आहेत की लोक त्यांना त्यांच्या शोमधील नावानीच ओळखतात. असेच एक पात्र श्रीमती सोडी यांचे आहे. जेनिफर मिस्त्री ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

शोमध्ये रोशन सोडीची पत्नी मिसेस सोडीच्या भूमिकेत जेनिफर मिस्त्री चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुरूवातीपासूनच जेनिफर या शो सोबत काम करत आहे. २०१३ मध्ये तिने हा कार्यक्रम सोडला होता.पण २०१६ मध्ये असित मोदी शोच्या निर्माता यांनी जेनिफर मिस्त्रीला परत आणले आणि पुन्हा तीच भूमिका दिली. जेनिफर मिस्त्रीने केवळ टीव्ही मालिकांमधूनच नव्हे तर एरलिफ्ट आणि हल्ला बोल यासारख्या मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

जेनिफर मिस्त्री कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे –

एका मुलाखती दरम्यान, जेनिफरने हे उघड केले की ती कराटे मधील ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. तिने २५ वर्षांपूर्वी सराव सोडला होता, परंतु या लॉकडाऊनमध्ये तिने पुन्हा सराव सुरू केला आहे. त्याचबरोबर, ती एक उत्तम कथक नर्तक देखील आहे.

मिसेस रोशन सोडी यांचे वास्तविक जीवन

शोमध्ये सोडीची पत्नी आणि रोशन भाभी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जेनिफर मिस्त्री वास्तविक जीवनातील एक पारशी महिला आहे. जेनिफरच्या वास्तविक जीवनाबद्दल बोलताना तिच्या नवऱ्याचे नाव मयूर उर्फ बॉबी बन्सीवाल आहे. मयूर पेशाने एक अभिनेता आणि छायाचित्रकार आहे. जेनिफर आणि मयूरचे इंटर रिलीज लग्न झाले आहे. या दोघांना लेकीशा बन्सीवाल नावाची एक मुलगी देखील आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral