कलाविश्व हादरल ! प्रसिद्ध कलाकाराचे झाले दुःखद निधन, स्टेजवर नाचत असताना..

एखादी कला सादर करत असताना जर एखादा व्यक्ती आपल्याला सोडून जात असेल तर याला काय म्हणावे. याएवढे कुठलेही वाईट नाही. मात्र, असा मृत्यू येणे देखील खूप भाग्यवान आहे, असे देखील म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी स्टेजवर कला सादर करत असतानाच एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
हा व्यक्ती देखील रामलीला मध्ये हनुमानाची भूमिका साकारत होता, तर आता देखील एका कलाकाराचा शंकराची भूमिका साकारत असताना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया. रामलीला सादर करत असताना या कलाकाराचा मृत्यू झाला आहे.
या कलाकाराचे नाव झाप्पन पांडे असे आहे. झाप्पन पांडे हे गेल्या अनेक वर्षापासून रामलीला यामध्ये काम करतात. पांडे हे 55 वर्षाचे होते. मात्र, स्टेजवरच कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. रामलीला सुरू असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर अनेक जण त्यांच्याकडे पाहत राहिले.
त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पांडे हे रामलीला मध्ये गेल्या सहा वर्षापासून शंकराची भूमिका सादर करत होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत देखील होती. ज्यावेळेस ते रामलीला सादर करत होते त्यावेळेस देखील ते शंकराच्या भूमिकेतच होते. त्यानंतर ते स्टेजवर कोसळले.
ज्यावेळेस ते स्टेजवर कोसळले, त्यावेळेस ते शंकराच्या भूमिकेत होते. त्यामुळे त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. रामलीला सुरू होण्यापूर्वी दररोज शंकराची आरती करण्यात येते. त्याप्रमाणे शंकराची आरती करण्यात येत होती. एक व्यक्ती शंकराची आरती करत होता.
आरती झाल्या झाल्या पांडे हे स्टेजवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, उपाययोजना म्हणून त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत माहिती मिळाली आहे.
पांडे यांना ज्या व्यक्तीने पाहिले त्यांनी सांगितले की, पांडे यांना पूर्वीपासूनच घाम येत होता. ते खूप अस्वस्थ होते. मात्र, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ते लगेच स्टेजवर कोसळले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी खूप मोठा धक्का बसला आहे.