शेवट पर्यंत खऱ्या प्रेमासाठी तरसत राहिली ही अभिनेत्री, 2 लग्न केले परंतु दोन्ही नवरे निघाले ही…

आज आपण बोलणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री जीनत च्या बाबतीत,जीनत पहिल्यापासून मॉडेलिंग मध्ये करिअर कण्यासाठी इच्छुक होती त्यामुळे तिने ब्युटी काँटेस्ट मध्ये सहभाग घेतला होता.1970 मध्ये तीने फेमिना मिस इंडिया आणि मिस इंडिया पॅसिफिक इंटरनॅशनल ‘किताब जिंकला होता.
ब्युटी काँटेस्ट जिंकल्यावर तिला बॉलीवूडमध्ये ऑफर मिळाली होती आणि 1971 मध्ये आलेल्या हरे राम हरे कृष्णा या चित्रपटाने तिची जगाला ओळख करून दिली.तिला चित्रपटात देव आनंद घेऊन आले होते.चित्रपटसृष्टी मध्ये पाऊल टाकताच जीनत चे अफेअर चे किस्से चालू झाले.
सोबत काम करत असताना जीनत ला 4 मुलाचे वडील असलेल्या संजय खान वर प्रेम जडले.या गोष्टीची भनक संजयच्या पत्नीला म्हणजे जरीन खानला लागली.बातम्या तर अशा प्रकारे पसरल्या होत्या की अब्दुल्ला च्या शूटिंग दरम्यान दोघांनी गपचूपरित्या लग्न देखील केले होते.
संजय आणि जीनत ला घेऊन एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे की 1979 या वर्षी मुंबईतील हॉटेल ताज मध्ये पार्टी चालू असताना संजयने सर्वांसमोर जीनतला मारले देखील होते. तुमच्या माहिती साठी की संजयने तिला एवढं मा रलं होत की तिचा ज बडा तुट ला होता.
ऑपरेशन नंतर तर तिचा ज बडा ठीक झाला पण तिचा डावा डोळा खराब झाला होता.ही गोष्ट तिने बायोग्राफी द बिग मिस्टेक ऑफ माय लाईफ या मध्ये लिहिली आहे. यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.1985 मध्ये जीनतने मजहर खान सोबत दुसरे लग्न केले पण तिथे सुद्धा अवहेलना सोडून दुसरे काही मिळाले नाही.
मजहर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला मार पिट करत असत.या सर्व गोष्टीला कंटाळून तिने मजहर सोबत तलाक घेण्याचे ठरवले.पण या दोघांचा तलाक होण्यापूर्वीच मजहर हे जग सोडून गेला.तुमच्या माहितीसाठी की मजहर आणि जीनतला 2 मुले आहेत.
जीनत चे वडील अमानुल्लाह खान स्क्रिप्ट राइटर होते व त्यांनी मुगल-ए-आजम आणि पाकीजा सारख्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती.जीनत जेव्हा 13 वर्षाची होती तेव्हा तिचे वडील वारले होते.तिने तिच्या नावाबरोबर तिच्या वडिलांचे नाव जोडले होते ती जीनत खान पासून नंतर जीनत अमान झाली.
जीनत अमान ही देव आनंदला खूप आवडत होती.तिच्यासोबत त्यांनी हिरा पन्ना,इश्क इश्क इश्क,प्रेमशास्र,वारंट,डार्लिंग डार्लिंग,आणि कलाबाज या सारखे चित्रपट केले.खूप वर्षानंतर देव आनंद यांनी कबुल केले होते की ते जीनत वर प्रेम करत होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.