जॉनी लिव्हर यांच्या पत्नीला पाहिलंत का ?

बॉलीवूडमध्ये बाजीगर यासह बादशहा आणि अनेक चित्रपटात आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना गुदगुल्या करणारे जेष्ठ विनोदवीर अभिनेते जॉनी लिव्हर यांची कॉमेडी काही वेगळीच असते. जॉनी लिव्हर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
अतिशय गरिबीमध्ये त्यांनी आपली करिअर सुरू केले. सुरुवातीला असलेली आवड हीच क्षेत्र म्हणून त्यांनी निवडले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. जॉनी लिव्हर यांनी आपल्या अफलातून टायमिंगने सगळ्याच रसिक प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवले. त्यांनी काम केलेले सगळेच चित्रपट हिट राहिले. जॉनी लिव्हर यांना त्यांच्या यशामध्ये अनेकांनी साथ दिली.
अनिल कपूर, सतीश कौशिक यांच्यासह इतरांनी त्यांना साथ दिली. मात्र, त्यांना कुटुंबीयांनी देखील खूप भरभरून साथ दिली. याबाबत जॉनी लिव्हर हे अनेकदा बोलताना देखील दिसतात. जॉनी लिव्हर यांनी सुजाता यांच्यासोबत 1984 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर सुजाता यांनी त्यांना अतिशय भरभरून अशी साथ दिली.
त्यामुळेच जॉनी लिव्हर हे नेहमी सांगत असतात की, माझ्या आईप्रमाणे माझ्या पत्नीने देखील मला खूप साथ दिली. त्यामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकलो. जॉनी लिव्हर यांना दोन मुलं आहेत. जेमी आणि जेसी. जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेमी याला काही वर्षांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते. त्यावेळेस जॉनी लिव्हर यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले होते.
आपल्या मुलाच्या उपचारासाठी ते दहा दिवस खूप प्रार्थना करत होते. त्यावेळेस देखील त्यांना त्यांच्या पत्नीने खूप भरभक्कम मदत केली. त्यानंतर त्यांचा मुलगा या आजारातून सावरला. एकूण जॉनी लिव्हर यांना त्यांची पत्नी सुजाता यांनी खूप मदत केली आहे. त्यामुळेच जॉनी लिव्हर हे नेहमी आपल्या पत्नीचे नाव घेत असतात.