आमिर खानच्या ‘त्या’ घाणेरड्या कृत्यामुळे जुहीने त्याच्यासोबत काम करणे बंद केले होते, कारण जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल

आमिर खानच्या ‘त्या’ घाणेरड्या कृत्यामुळे जुहीने त्याच्यासोबत काम करणे बंद केले होते, कारण जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल

बॉलिवूडचे जग नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींबद्दल चर्चेत असते. तिथे इतर कशाबद्दलही चर्चा होईल की नाही ते नाही माहिती, परंतु स्टार लोकांच्या अफेअर्स बद्दल खूप चर्चा केली जाते.

बरेचदा आपण पाहिले असेलच की बर्‍याच चित्रपटांमध्ये बरेच अभिनेते आणि अभिनेत्री एकत्र काम करतात आणि लोकांना वाटते की त्यांच्यात काहीतरी नक्कीच चालू आहे. आणि त्यांच्यात तसे काहीही नसते. परंतु अचानक ते काही कारणास्तव एकत्र काम करणे थांबवतात. आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबई येथे झाला होता. आमिर खानने आपल्या कारकीर्दीत बर्‍याच अभिनेत्रींबरोबर काम केले. त्यापैकी काही हिट तर काही सुपर हिट तर काही फ्लॉप ठरल्या.

त्यातील एक अभिनेत्री जूही चावला आहे, जिच्याबरोबर आमिर खानची जोडी चांगलीच पसंतीला उतरली होती. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण एक वेळ अशी आली होती की जुहीने आमिर खानबरोबर काम करण्यास नकार द्यायला सुरुवात केली होती. आता तुम्ही देखील विचार करत असतान की या सुपरहिट जोडीमध्ये असे काय घडले जेणेकरून जुही अमीर सोबत काम करायला नकार देऊ लागली.

आमिर खानच्या त्या मस्करीने सर्व बदलून टाकले –

1988 च्या ‘कयामत से कयामत तक’ मध्ये आमीर खान आणि जूही चावलाने लीडरोल म्हणून काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि या जोडीला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. या चित्रपटा नंतर दोघांची चांगली मैत्री झाली होती, पण आमिर खानच्या मस्करीने या दोघांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. आणि त्या मस्करीमुळे दोघे एकत्र चित्रपटात काम करत नव्हते.

गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा चित्रपट इश्क (1997) च्या सेटवर आमीर खानने जूही चावलाबरोबर एक घाणेरडा विनोद केला होता. चित्रपटाच्या सेटवर आमीरने जुहीला सांगितले होते की तो ज्योतिषी आहे आणि तिने तिचा हात आपल्याला दाखवावा. जुहीने आपला हात दाखवताच आमिर खान तिच्या हातावर थुंकला.

जूही आमिर खानच्या या कृत्यामुळे चांगलीच संतापली होती. आमिरचा हा विनोद तिला आवडला नव्हता आणि तिने सेट सोडला. इतकेच नाही तर जूहीने चित्रपटाची शूटिंग करण्यासही नकार दिला. जरी नंतर जुही चावलाने चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले, पण पुन्हा आमिर खानसोबत काम करणार नसल्याचे तिने वचन दिले. पुढे 5-6 वर्षे एकमेकांमध्ये कोणतेही बोलणे झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जूहीला आमिर खानसमवेत राजा हिंदुस्थानीची ऑफरही मिळाली होती पण तिने काम करण्यास नकार दिला. नंतर जुहीने आमिर खानशी बोलण्यास सुरवात केली. तुम मेरे हो (1990) च्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही आमिर खानने जूही चावलाच्या हातात साप दिला होता आणि तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला होता आमिर खानच्या या कृत्याने जुही खूप घाबरली आणि तत्काळ सेटवरून पळून गेली.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral