अतिसार (जुलाब) लागली आहे, हे घरगुती उपाय करा. अर्ध्या तासात आपल्याला आराम मिळेल

अतिसार (जुलाब) लागली आहे, हे घरगुती उपाय करा. अर्ध्या तासात आपल्याला आराम मिळेल

अनेकदा पोटाच्या आजारामुळे आपल्याला अतिसार लागण्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. तसेच आजकाल बाहेरचे खाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे पोट बिघडून आपल्याला अतिसार अशी समस्या लागते. अतिसार लागल्याने आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. व त्याने आपल्याला अशक्तपणा मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे काही काम करायचे आपल्याला शक्य होत नाही.

अशा वेळेस आपण डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेतो. त्यामुळे आपल्याला त्रास अधिकच वाढतो. मात्र, अतिसार, हगवण, पोटदुखी असे काही आपल्याला त्रास होत असल्यास आपण घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता..आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये जर आपल्याला अतिसार लागली असेल तर त्यावर कुठले उपाय करावेत. याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

1) डाळिंब : डाळींब हे अतिशय बहुगुणी फळ आहे. डाळिंबामध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जर आपल्याला अतिसार लागली असेल तर डाळिंबाच्या पानाचा रस दोन चमचे घेऊन त्यात साखर टाकून घ्यावा. आपली अतिसाराची समस्या ही थांबेल.

2) नारळ पाणी, जिरे : हे असे बहुगुणी औषध आहे. नारळ पाणी पिल्याने आपल्याला शक्ती येत असते. अतिसाराची समस्या असल्यास आपण एक ग्लास नारळाच्या पाण्यामध्ये एक चमचा वाटलेले जिरे टाकून ते प्यावे. आपली अतिसार समस्या लवकरच थांबेल.

3) पपई : पपईमध्ये मोठे औषधी-गुण भरलेले असतात. अतिसार लागलेल्या लोकांनी उकडलेली कच्ची पपई दोन ते तीन दिवस खावी. यामुळे आपली अतिसार समस्या कमी होते.

4) जायफळ : जायफळमध्ये मोठे आयुर्वेदिक गुणधर्म हे भरलेले असतात. जायफळ लिंबाच्या रसात उघडून घ्यावे. त्यानंतर पोट साफ होते आणि पोटातील वायू नष्ट होतात.

5) दूध : अतिसार लागल्यावर दूध हे पिऊ नाही म्हणतात. मात्र, आपल्याला पोटदुखी किंवा अतिसार समस्या असल्यास चार चमचे दुधामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण घ्यावे. यामुळे अर्ध्या तासात आपल्याला आराम पडतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *