दख्खनचा राजा जोतिबा मध्ये महालक्ष्मी ची भूमिका करणारी अभिनेत्री पहा कशी दिसते…

दख्खनचा राजा जोतिबा मध्ये महालक्ष्मी ची भूमिका करणारी अभिनेत्री पहा कशी दिसते…

सध्या छोट्या पडद्यावर मालिकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना महामारीमुळे सर्व मालिका या बंद झाल्या होत्या. अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. मालिकांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे पूर्वी झालेल्या मालिका या रीटेलिकास्ट करण्यात येत होत्या.

मात्र, कोरोना महामारीमुळे ते संकट आता हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे आता मालिका पुन्हा एकदा सुरू होत आहेत आणि त्यांना पुन्हा रोजगाराच्या संधीदेखील खुणावताहेत. छोट्या पडद्यावर सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील अनेक मालिका मोठ्या गाजत आहेत. यामध्ये आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार या मालिकांनी चांगलेच प्रेक्षकवर्ग निर्माण केले आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवर दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. यामध्ये जोतिबाची भूमिका करणारा मुलगा देखील खूप गाजत आहे. तसेच इतर पात्र देखील यामध्ये खूप चालत आहेत. या मालिकेत करवीर निवासिनी महालक्ष्मीची भूमिका देखील मोठ्या प्रमाणात चालत आहे. ही भूमिका अभिनेत्री निशा परुळेकर हिने साकारलेली आहे. निशा ही मूळ मुंबईमधील आहे.

तिचा जन्म 19 सप्टेंबर 1984 मध्ये कांदिवलीमध्ये झाला. तसेच तिचे शिक्षण देखील मुंबईत झालेले आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिका देखील काम केलेले आहे. तिने सुरेश याच्यासोबत लग्न केलेले आहे. तिला मयुरी नावाची मुलगी आहे. तिने टूर टूर, चष्मे बहादुर धूम धडाका, राहिले दूरवर या सारख्या चित्रपटात काम केले आहे.

मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या सोबत देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. 2012 मध्ये आलेल्या तीन बायका फजिती ऐका या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती. त्यानंतर बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका देखील ती चांगली चालत आहे. 2015 मध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील महानायक वसंत हा चित्रपट देखील खूप चालला होता.

सध्या तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आणि मालिकांच्या ऑफर असल्याचे सांगण्यात येते. तिच्याकडे सध्या वेळच नसल्याचे देखील बोलले जात आहे. आगामी काही काळात ती अनेक चित्रपटांमधून दिसणार असल्याचे बोलले जाते. कोरोणा महामारी मुळे सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद पडले होते.

मात्र, दिग्दर्शकांनी आता वयाच्या साठी पार केलेल्या अभिनेत्यांना मालिकेत न घेण्याचे ठरवले आहे. तसेच तरुण अभिनेत्यांना केवळ कामाची संधी द्यायची. तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवूनच काम करायचे. असा नियम त्यांनी घालून दिला आहे. तसेच सनी टायझर मास्क याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यामुळे आता कलाकार देखील सुरक्षित पणे काम करू शकणार आहेत.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral