वाईट बातमी ! ‘कच्चा बादाम’ चा फेम भुबन बड्याकार यांचा अपघात, गंभीर दुखापतीमुळे प्रकृती चिंताजनक

वाईट बातमी ! ‘कच्चा बादाम’ चा फेम भुबन बड्याकार यांचा अपघात, गंभीर दुखापतीमुळे प्रकृती चिंताजनक

कोलकाच्या रस्त्यावर शेंगदाणे विकणाऱ्या कच्चा बदाम कलाकाराचा आता भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अल्पावधीतच सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या भुबन बड्याकार याला लोकप्रियता प्रचंड मिळाली. मात्र, ही लोकप्रियता त्याच्या डोक्यात गेली.

अल्पावधीत सुपरस्टार झाल्यानंतर त्याला लाखो रुपये मिळाले. त्यामुळे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला आता शेंगदाणे फुटाणे त्याने विकायला आवडणार नाही. तो कच्चा बदाम कोलकत्यात विकतो. कोलकात्यामध्ये मोठ्या शेंगदाण्याला कच्चा बदाम असे म्हणतात. त्यामुळे त्याचे नाव कच्चा बदाम असे पडले.

गेल्या वर्षीच्या सुमारास राणू मंडल ही रेल्वे स्टेशन वर गाणे म्हणताना आढळली होती. एका व्यक्तीने तिचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर हिमेश रेशमिया याने तिला थेट आपल्या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटातील तिचे गाणे हे लोकप्रिय ठरले होते. ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ हे गीत गायले.

मात्र, हे तिचे शेवटचे ठरले. कारण कालांतराने ती आपले गुण दाखवू लागली. आता ज्या ठिकाणाहून रानु मंडल आली होती त्याच ठिकाणी ती पोहोचली आहे. आता सोशल मीडियावर ती छोटे-मोठे व्हिडिओ अपलोड करत असतात.

कच्चा बदाम हे गाणे भुबन हा देखील असाच लोकप्रिय झाला. तो कोलकात्याच्या रस्त्यावर दारोदारी कच्चा बदाम म्हणजेच शेंगदाणे विकायचा. याच वेळेस तो कच्चा बदाम हा गाणे देखील म्हणायचा. एका व्यक्तीने त्याचे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर तो रातोरात सोशल मीडिया स्टार झाला. त्याला लाखो रुपये मिळाले.

त्यानंतर त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मला आता शेंगदाणे विकायला लाज वाटते. सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर त्याला खूप पैसे मिळाले. त्यामुळे त्याने एक कार देखील खरेदी केली होती. पश्चिम बंगालच्या बीरभूमी येथे त्याच्या कारला नुकताच अपघात झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.

त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. लाखो रुपये मिळाल्यानंतर भुबन याने काही दिवसांपूर्वी एक कार खरेदी केली. ती कार चालवायला शिकत असताना त्याचा अपघात झाला अशी माहिती समोर आली आहे.

छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कच्चा बदाम गाणे लोकप्रिय झाल्यानंतर भुबन याला काही हॉटेलमध्ये देखील गाणे गाण्याची संधी देखील मिळाली होती. मात्र त्यांच्या स्वभावामध्ये नंतर बदल पाहण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.

मात्र, आता त्याचा अपघात झाल्याने अनेकांनी त्याच्यावर खूप टीका केली आहे.

Team Hou De Viral