सकाळी सकाळी कडुलिंबाचा पाला चावून खाल्ल्याने होतात अनेक आरोग्यदायी फायदे..

भारतीय वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म भरलेले असतात हे आपण जाणले असेल. तुळस, कडूलिंबू ,लिंबू, वड, पिंपळ असे अनेक झाडे आहेत की ज्यामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होत असतो. आणि आपण अनेक आजारांवर मात करू शकता.
हदयरोग, रक्तवाहिन्या, मलेरिया आणि इतर उपयोग आपल्याला कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने होत असतात. आपली प्रतिकारशक्ती देखील वाढू शकते आणि आपल्याला अनेक आजारावर मात देखील करता येते. तसेच दातावर देखील याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. अल्सर आजारावर देखील हा कडुलिंबाचा पाला अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. तर आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने काय फायदे होतात हे सांगणार आहोत.
1) दात स्वच्छ : जर आपले दात घाण झाले असतील तर आपण कडुलिंबाचा पाला किंवा कडू लिंबाची काडीने ब्रश करावा. असा प्रयोग आठवड्यातून काही दिवस करावा. यामुळे आपल्या दातावर साचलेली घाण ही लवकरात लवकर निघून जाते आणि आपले दात हे दणकट व्हायला मदत मिळते. तर कडुलिंबाचा पाला देखील आपण नुसता चावून खाऊ शकता आणि नंतर टाकून द्या आपल्या दातांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.
2) अल्सर : जर आपल्याला पित्ताचा त्रास असेल तर आपण नियमितपणे लिंबाचा पाला चावून खावा. तसेच आपल्याला अल्सरची समस्या असेल तरीदेखील आपण हा प्रयोग करून पाहावा. यामुळे आपल्याला काही प्रमाणात नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र, आठवड्यातून हा प्रयोग काही दिवस तरी आपल्याला करावा लागेल.
3) मलेरिया : जर आपल्या मलेरियासारख्या लक्षणे दिसत असतील तर आपण लिंबाचा पाला खावा आणि तो चावून खावा असे केल्याने मलेरियाची लक्षणे देखील दूर होऊ शकतात. मात्र, असे करताना आपण डॉक्टरांचा सल्ला देखील नक्की घ्यावा.
4) मधुमेह : ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा लोकांनी कडुलिंबाच्या पाण्याचे नियमितपणे सेवन करावे. असे केल्याने आपली मधुमेह पातळी ही कमी होऊ शकते. मात्र, हा प्रयोग आपल्याला नियमितपणे करावा लागेल. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील निश्चितच वाढेल.
5) सोयरासिस : जर आपल्याला सोयरासिसचा त्रास असेल तर आपण कडुनिंबाचा पाला हा नियमितपणे चावून खावा. आठवड्यातून काही दिवस हा पाला चावून खावा. आपल्याला सोयरासिस समस्याही निश्चित प्रमाणात कमी होऊ शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.