सिंघम फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक आजारा बाबत खुलासा, म्हणाली हा आजार…. चाहते चिंतेत

सिंघम फेम अभिनेत्रीने केला धक्कादायक आजारा बाबत खुलासा, म्हणाली हा आजार…. चाहते चिंतेत

साऊथ इंडियन सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. सध्या ती आपल्या जीवनातील खासगी गोष्टी देखील सोशल मीडियावर शेअर करत आहे. हल्लीच ‘सिंघम’ अभिनेत्री काजलने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये काजलने एका आजाराचा खुलासा केला आहे.

ही पोस्ट बघून चाहत्यांनी काजलला सलाम केला आहे. काजल अग्रवालने इंस्टाग्राम पोस्टवर अस्थमातून आराम देणाऱ्या इन्हेलरची माहिती दिली आहे. यातून अस्थमाची माहिती समजावून सांगितली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, इनहेलर्स किती महत्वाचं आहे. अस्थमाच्या या परिस्थितीत काजल डेअरी आणि चॉकलेटपासून कशी लांब राहिली आहे.

इनेहलर्सचा वापर करताना लाज बाळगू नये असं देखील ती म्हणाली आहे. काजलने म्हटलंय की,’जेव्हा मला माझ्यातील ब्रोन्कियल अस्थमाची माहिती मिळाली. तेव्हा मला माझ्या आवडत्या गोष्टी खाण्यापासून रोखण्यात आलं होतं. कल्पना करा की, एका लहान मुलाला डेअरी प्रोडक्टस् आणि चॉकलेट खाण्यापासून स्वतःला रोखणं किती कठीण असेल.

माझ्यासाठी हे अजिबातच शक्य नव्हतं. ‘पुढे काजल म्हणाली की,’जस जशी मी मोठी झाली. मला याबाबतची समज आली. जेव्हा पण मी कधी ट्रिपला जायचे तेव्हा माझा सामना सर्दी, धूळ, धूर सारख्या गोष्टींशी व्हायचा. यामुळे मला खूप त्रास होत असे.

‘काजल पुढे म्हणते की, या काळात माझ्यासोबत सतत इन्हेलर्स असायचे. मला जेव्हा पण श्वसनाचा त्रास व्हायचा तेव्हा मी इन्हेलर्सचा वापर करायचे. अगदी काही वेळातच मला चांगलं वाटायचं.

Team Hou De Viral