वाढदिवसाच्या दिवशी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई-वडिलांचे झाले निधन..

वाढदिवसाच्या दिवशी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई-वडिलांचे झाले निधन..

सध्या दिग्गज अभिनेते सुबोध भावे हे सूत्रसंचालन करत असलेल्या बस बाई बस या कार्यक्रमाची चर्चाही खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी महिला सहभागी झाल्या आहेत.

या शोमध्ये नुकतीच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफाली ही भूमिका करणारी अभिनेत्री काजल काटे ही देखील सहभागी झाली होती. यावेळेस काजल काटे हिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. तिने आपल्या वडिलांचे कशाप्रकारे निधन झाले याबद्दल देखील माहिती दिली.

याबाबत काजल काटे हिने बोलताना माहिती दिली की, आई-वडिलांच्या निधनानंतर मग झी मराठीचा माझी तुझी रेशीम गाठ हा प्रोजेक्ट मिळाला. ऑडिशन दिली. परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. हे सगळं घडलं आई-बाबांच्या आशीर्वादामुळे.

या पुरस्काराचे श्रेय जेवढे माझ्या आई-बाबांना जातं तेवढच माझ्या सगळ्या सर्व कलाकारांना देखील जाते, अशी भाऊक पोस्ट तिने‌ केली होती. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या खूप गाजते आहे. काजलला नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला होता. या वेळी काजल हिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली होती.

आता बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर काजल काटे हिने आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काजल म्हणते, माझे आई-बाबा 2021 एप्रिल महिन्यात कोरोनाच्या भयंकर लाटेत मला आणि माझ्या बहिणीला एका क्षणात सोडून गेले आणि आमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरली. माझे आई वडील बेंगलोरला होते.

त्यावेळेस माझ्या आई-वडिलांना एकदम कोरोना झाला. त्यांना कोरोना झाला हे समजलेच नाही. त्यांना वाटले की, सर्दी खोकल्याचा त्रास आहे. आधी वडील गेले त्यानंतर पंधरा दिवसांनी आई गेली. वडिलांचा ज्या दिवशी वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांचे निधन झाले होते. त्याच्या पंधरा दिवसानंतर मला माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते.

मात्र, त्यांच्या निधनानंतर माझ्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली, असे काजल काटे हिने सांगितले आहे. त्यानंतर सुबोध भावे यांच्यासह सहभागी झालेले सगळेच कलाकार प्रेक्षक हे खूपच भावनिक झाले होते.

Team Hou De Viral