मला दिली गेली होती तशी ऑफर, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या ‘ह्या’ अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक अनुभव

मला दिली गेली होती तशी ऑफर, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधल्या ‘ह्या’ अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक अनुभव

छोट्या पडद्यावर सध्या बस बाई बस हा कार्यक्रम खूपच गाजत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार हे सहभागी झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अमृता फडणवीस या देखील या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या, तर आता या शोमध्ये एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सहभागी झाली होती.

तिने या शोमध्ये अनेक दिलखुलास प्रश्नांना उत्तर दिले. बस बाई बस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे हे करतात. आता देखील या शोमध्ये काजल काटे ही अभिनेत्री सहभागी झाली होती. काजल काटे हिने माजी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये शेफालीची भूमिका केली.

शेफाली हिचे माझी तुझी रेशीम गाठमधील पात्र प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. शेफाली हिला 500 कोटी रुपये असलेला नवरा हवा असतो. शेफाली हिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकामध्येही काम केलेले आहे. शेफालीचे खरे नाव काजल काटे असे आहे.

काजल हिने आजवर अनेक चांगल्या चांगल्या मालिकामध्ये काम केलेले आहे. काजलने झी मराठीवर “तुझे माझे ब्रेकप”, “डॉक्टर डॉन”, “स्वराज्य जननी जिजामाता” यासारख्या मालिकेत काम केले आहे. तिच्या या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. 2019 मध्ये तिने फिटनेस ट्रेनर प्रतीक कदम याच्या सोबत लग्न केले आहे.

काजलच्या सोबतच तिची बहीण देखील अभिनेत्री आहे. तिच्या बहिणीचे नाव स्नेहा काटे शेलार असे आहे. स्नेहा देखील अतिशय उत्कृष्ट असे काम करत असते. स्नेहा हिने आजवर हिंदी तसेच मराठी चित्रपट व मालिका काम केलेले आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर या मालिकेत सध्या ती झळकत आहे. काही वर्षांपूर्वी तिने ऋषिकेश शेलार याच्या सोबत लग्न केले आहे.

ऋषिकेश शेलार हादेखील अभिनेता असून त्याने देखील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेत काम केलेले आहे. त्याचबरोबर “सावित्री ज्योती” या मालिकेतील त्याची भूमिका खूप गाजलेली आहे. तसेच “छत्रीवाली”,”लक्ष्मी सदैव मंगलम” या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.

आता बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शेफाली हिने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. सुबोध भावे याने काजल हिला तिच्या आयुष्यात आलेल्या एखाद्या अनुभवाबाबत माहिती विचारली. त्यावर काजल हिने सांगितले की, मला करीयरच्या सुरवातीला एक धक्कादायक अनुभव आल्याचे सांगितले.

काजल म्हणाली की, मी जेव्हा करिअरच्या सुरुवातीला मुंबईला आले होते, त्यावेळेस एका दिग्दर्शकाने मला कॉम्प्रमाईज करशील का? असे थेट विचारले होते. त्यावर मी त्याला थेट कानाखाली ठेवून दिली होती. आणि त्यानंतर मी माझ्या मित्राला फोन करून बोलावून घेतले होते. त्यांनी मला मग थोडा धीर दिला. मग आम्ही सोबत गेलो असे तिने सांगितले.

Team Hou De Viral