कांद्याची पात खाण्याचे ‘हे’ फायदे वाचाल तर अवाक् व्हाल !

हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे. हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. याचे शरीराला होणारे फायदेही खूप आहेत. आज याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
1) व्हायरल ताप – कांद्याच्या पात मध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरस तत्वामुळं फ्लू, इंफेक्शन आणि व्हायरलच्या व्हायरसपासून शरीराची रक्षा होते. श्वसन तंत्र हेल्दी राहिल्यानं नियमित येणाऱ्या समस्या येत नाहीत.
2) कॅन्सरचा धोका – कांद्याच्या पातीत एलिल सल्फाईड नावाचं शक्तीशाली सल्फर कंपाऊंड असतं. हे कोलोन कॅन्सर रोखण्यात मदत करतं. याचे फ्लेवोनोईड्स तत्व जॅन्थीन ऑक्सिडेस एंजाइमची शरीरात निर्मिती करतं. यामुळं डीएनए आणि सेल्सचं होणारं नुकसान टाळता येतं.
3) हृदय – कांद्याच्या पातीमधील अँटी ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए आणि सेल्स टिश्यूचं होणारं डॅमेज रोखतात. यातील व्हिटॅमिन सीमुळं ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. यामुळं हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. नियमित कांद्याची पात खाल्ली तर हृदयाला फायदा मिळतो.
4) शुगर लेवल – कांद्याच्या पातीमधील सल्फर कंपाऊंड शरीरातील ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यास मदत करतं. यामुळं इंसुलिनचं प्रमाण वाढून रक्ताच्या माध्यमातून बॉडी सेल्सपर्यंत शुगर चांगल्या प्रकारे पोचून चांगला रिझल्ट मिळतो.
5) हाडं – यातील व्हिटॅमिन सीमुळं हाडं मजबूत राहतात. यामुळं शरीरातील कोलेजन वाढतं. इतकंच नाही तर यानं बोन डेन्सिटी मेंटेन राहण्यासाठी मदत मिळते.
6) डोळे – कांद्याच्या पातीमध्ये ल्युटीन आणि जक्सॅथीन सारखे कारोटेनोईड असतात. यामुळं डोळे निरोगी राहतात. डोळ्यींची दृष्टीही सुधारते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.