सिनेसृष्टीवर शोककळा ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकाराचे दुःखद निधन

सिनेसृष्टीवर शोककळा ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकाराचे दुःखद निधन

जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसते हे सर्व निसर्गाच्या हातात असते. त्यामुळे आपल्याला जो जन्म मिळाला आहे, त्या जन्मात सत्कर्म करून चांगले आयुष्य जगावे असे अनेक जण सांगत असतात. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपभोग आपण घेता पाहिजे. नाहीतर आपल्याला काही इच्छा अपूर्ण राहतात. त्यामुळे आनंदी राहून सर्वांशी प्रेमाने वागावे अशीच शिकवण अनेक जण देत असतात.

गेले काही दिवसापासून मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी मधून अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेले आहेत. अगदी आजच्या दिवशी दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कला समीक्षक कौशिक यांचे हृदयविकार झटक्याने निधन झाले. ते केवळ 37 वर्षांच्या होते, तर अलीकडच्या काळामध्ये लता मंगेशकर यांचे देखील निधन झाले.

त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपट सृष्टी तसेच बॉलीवूड ला मोठा धक्का बसला होता. त्यापाठोपाठ बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे देखील निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर बप्पी लहरी यांचे देखील निधन झाले. अलीकडच्या काळामध्ये संगीत क्षेत्राला देखील खूप मोठे धक्के बसले आहेत.

नदीम श्रवण या जोडी पैकी प्रसिद्ध श्रवण राठोड यांचा देखील कोरोनाने गेल्या वर्षीच्या सुमारास मृत्यू झाला होता. श्रवण राठोड हे आपल्या कुटुंबासोबत कुंभमेळा येथे गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला. आता देखील कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना देखील हृदयविकाराचा झटका असून ते सध्या व्हेंटिलेटर वर आहेत.

आता देखील संगीत क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ संगीतकार यांचे देखील निधन झाले आहे. या कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. कन्नड सुगम संगीताचे बादशहा ते समजले जायचे. त्यांचे नाव सुबंना असे होते. त्यांनी अनेक गीत कन्नड मध्ये रचली आहेत. ते पेशाने वकील होते. मात्र, त्यांना गायनाची खूप आवड होती.

त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात आपले करिअर केले. सुरुवातीच्या काळामध्ये सुबंना यांनी नोटरी पासूनचे सर्व कामे केली. सुबंना यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्ष होते. त्यांनी ज्ञानपीठ विजेत्या कवीच्या अनेक कवितांना संगीतबद्ध केले होते.

Kannada singer Shivamogga Subbanna

1978 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Team Hou De Viral