खोबरेल तेलात ‘कापूर’ मिसळून ते वापरण्याचे आहेत खूप जबरदस्त फायदे

खोबरेल तेलात ‘कापूर’ मिसळून ते वापरण्याचे आहेत खूप जबरदस्त फायदे

कोणताही धार्मिक विधी करताना आरती केली जाते. देवतेच्या फोटो अथवा मुर्तीला कापूर आरती करुन ओवाळले जाते. याच कारणामुळे पूजेच्या साहित्यात हमखास आढळणारा कापूर माणसासाठी अतिशय लाभदायी आहे. डोळे मिटले आणि पापण्यांवर हलक्या हाताने थोडी कापूर पूड (कापूर पावडर) लावली तर थंड वाटते. कारण कापूर अँटिबायोटिक आणि अँटीफंगल आहे. याच गुणधर्मांमुळे कापूरवड्या नारळाच्या तेलात टाकून ते तेल हवाबंद डब्यात भरुन ठेवतात.

काही काळानंतर कापराचे गुणधर्म नारळाच्या तेलात उतरतात. या पद्धतीने तयार केलेले कापराचे तेल मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे. बाजारात कापराचे तेल विकत मिळते. पण अतिशय सोपी पद्धत असल्यामुळे कापूरवड्यांपासून घरच्या घरीही कापराचे तेल तयार करता येते. या तेलाचा अनेक प्रकारे उपयोग शक्य आहे. कापराच्या तेलाचे आठ प्रमुख जादुई फायदे आहेत. जाणून घेऊया हे फायदे.

कापराच्या तेलाचे आठ जादुई फायदे –

शरीराच्या कोणत्याही भागाला वेदना होत असल्यास कापराचे तेल कोमट करुन लावा. आराम पडेल. स्नायू वा हाडाच्या दुखापतीमुळे वेदना होत असल्यास तात्पुरता आराम मिळाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वैद्यकीय सल्ल्याने उपचार करुन घ्या.

कपाळाला आणि केसांना दररोज रात्री झोपण्याआधी कापराचे तेल लावून छान मॉलिश करा. नंतर झोपा. डोकेदुखी, ताणतणाव यामुळे झोप न येणे, अपुरी झोप होणे अशा समस्या जाणवत असतील तर त्या समस्याही कपाळाला आणि केसांना कापराच्या तेलाने नियमित मॉलिश केल्याने दूर होतात.

कापराच्या तेलाने दररोज डोक्याचे मॉलिश करावे. केसांची वाढ उत्तम प्रकारे होते. केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. केस बळकट होतात. केस गळती थांबते. कापराचे तेल आणि दही यांचे मिश्रण केसांच्या मुळांना लावावे आणि एक तासानंतर केस स्वच्छ धुवावे. या प्रयोगाचा केसांना प्रचंड लाभ होतो.

त्वचेवर जळणे, फाटणे अथवा इतर कोणत्याही कारणाने व्रण अथवा डाग दिसत असतील तर त्या ठिकाणी नियमित कापराचे तेल लावावे. त्वचेवरील डाग वा व्रण पुसट होत जातात.

सर्व प्रकारच्या त्वचा विकारंसाठी कापराचे तेल हे उत्तम औषध आहे. नियमित कापराचे तेल लावल्याने त्वचा आणखी उजळते तसेच स्वच्छ, निरोगी, गुळगुळीत, नितळ, डागरहित होते.

शरीरावर ज्या ठिकाणी गळू, पुटकुळी, मुरुम झाले आहे अशा ठिकाणी कापराचे तेल नियमित लावा. गळू, पुटकुळी, मुरुम झटपट बरे होईल. तसेच त्वचेवरील गळू, पुटकुळी, मुरुम यांचे डाग कापराचे तेल मुळासकट काढून टाकेल.

एका बादली अथवा टबमध्ये सहन होईल एवढे कोमट पाणी घ्या. या पाण्यात कापराच्या तेलाचे पाच ते दहा थेंब टाका. आता या पाण्यात पाय बुडवून थोडा वेळ बसा. टाचा स्वच्छ होतील तसेच पायाला भेगा पडत असल्यास हा त्रास कमी होईल. नियमित हा उपाय केल्यास पायाच्या भेगांचा त्रास कायमचा दूर होईल. पाय दुखत असतील तर हा प्रयोग पायांना आराम देतो. पण सांधेदुखी अथवा एखाद्या स्नायू वा हाडाच्या दुखापतीमुळे पाय दुखत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या.

केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे अशा समस्यांवर उपाय करण्यासाठी दररोज केसांना कापराच्या तेलाने मॉलिश करावे

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral