ही प्रसिद्ध अभिनेत्री सरोज खान यांच्या भीतीने बाथरूममध्ये करायची डान्स!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा काळ बॉलिवूडसाठी भलताच अवघड काळ ठरला आहे. अनेक मोठे कलाकार या दरम्यान काळाच्या पडद्याआड झाले आहेत.
इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, सुशांत सिंह राजपूत यांच्यानंतर आता सरोज खान यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी सकाळी हृदयक्रिया बंद पडल्याने सरोज खान यांची प्राणज्योत मालवली.भल्याभल्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या सरोज खान यांना बॉलिवूडमध्ये मास्टरजी या नावाने ओळखलं जायचं.
श्रीदेवी, माधुरी, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, करीना कपूर अशा अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केलं. यातील काहींना त्यांनी नृत्याचे प्राथमिक धडेही दिले. या अभिनेत्रींमध्ये करीना कपूर ही अशी अभिनेत्री होती जिने सरोज खान यांचा भरपूर ओरडा खाल्ला आहे.सरोज खान यांच्या निधनानंतर तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्या करीना सरोज यांच्या शिकवणीचे प्रसंग सांगत आहे.
ती म्हणते की, एकदा मध्यरात्री चित्रीकरण सुरू होतं. करीनाच्या स्टेप्स सरोजजींना पसंत पडत नव्हत्या. अखेर सरोजजी करीनावर संतापल्या आणि म्हणाल्या, ए पोरी, कंबर हलव. रात्रीचा एक वाजलाय, काय करतेयस तू..? असं म्हणत सरोज खान यांनी करीनाची खरडपट्टी काढली होती.
करीना असंही म्हणाली की, मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेत असे. आणि सरोजजी जे काही नृत्यविभ्रम मला शिकवत त्यांचा सराव करत असे.करीनाने सरोजजींच्या निधनानंतर एक भावपूर्ण पोस्ट शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. आपण नृत्यकौशल्य शिकावं यासाठी सरोज खान नेहमी आपल्याला सांगत असत, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
ती म्हणते की, त्या मला नेहमी सांगत असत.. तू पाय थिरकवू शकत नसलीस तर कमीत कमी चेहऱ्यावर भाव येऊ दे. नृत्याची मजा घे, हस आणि डोळ्यांमधून तुझं हास्य दिसू दे. हे त्यांनी मला शिकवलं. त्यांच्यासारखं अन्य कुणीच असू शकत नाही.. असे भावूक शब्द करीनाने त्यांच्यासाठी लिहिले आहेत.
आमच्या इतर बातम्या –
महेंद्र सिंह धोनी ने पत्नी साक्षीवर केले असले आरोप, म्हणाला – तिच्या फायद्यासाठी ती..
एकेकाळी सलमानच्या पाठीमाघे गर्दीत डान्स करायची ही अभिनेत्री, आज बनली आहे प्रसिद्ध ‘हॉट’ अभिनेत्री