पहिला चित्रपट हिट दिल्यानंतर या अभिनेत्रींच्या करिअरला जणू लागलं ग्रहण, 5 नंबर वाली तर

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की जिथे तुमचा चेहरा जोपर्यंत चांगला आहे, तोपर्यंत तुम्हाला विचारत असतात. जोपर्यंत तुमचे नशीब आहे, तोपर्यंतच तुम्हाला येथे किंमत असते. चित्रपट भेटणे बंद झाले की, तुम्हाला कोणीही विचारत नाही. त्यामुळे सातत्याने येथे यशासाठी झगडावे लागते. मात्र, हे यश सगळ्यांनाच मिळते असे नाही. बॉलिवूडमध्ये असे काही चेहरे आहेत की, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला हिट चित्रपट दिले आणि हे चेहरे सगळ्यांना आवडले देखील.
मात्र, असे असूनही त्यांना नंतर संधीच मिळाली नाही. याचे कारण हे वेगवेगळे असू शकतात. मात्र, त्यांना संधी न मिळाल्याने त्यांचे करिअर मात्र बरबाद झाल्याचे दिसत आहे. अनेकांच्या बाबतीत संधी मिळून सुद्धा देखील चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या करिअरवर पाणी सोडावे लागले होते. आज आम्ही आपल्याला अशाच काही अभिनेत्रीबाबत माहिती देणार आहेत. ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला हिट चित्रपट दिले नंतर त्यांची नय्या काही पार होऊ शकली नाही.
1) सोनल चौहान : सोनल हा बॉलिवूडमधील एकेकाळचा लोभस असा चेहरा होता. तिने जन्नत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात इम्रान हाश्मी तिच्यासोबत होता. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले. असे असूनही तिला त्यानंतर काही चित्रपट मिळाले नाही आणि ती फ्लॉप कॅटेगिरी मध्ये जाऊन बसली. आता ती सध्या काय करते हे कोणालाही माहीत नाही.
2) प्रीती जांगियानी : हा अतिशय सुंदर असा चेहरा बॉलिवूडला मिळाला होता. तिने यश चोप्रा यांच्या मोहब्बते या चित्रपटातून पदार्पण केले होते. 2000 चाली हा चित्रपट आला होता. 2008 मध्ये तिने परवीन डबा स सोबत लग्न केले. त्यानंतर तिला चित्रपट भेटण्याचे बंद झाले. आता तिने बॉलीवूडला जवळपास राम राम केला आहे.
3) ईशा गुप्ता : ईशा गुप्ता ही 2007 मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि काही जाहिरातींमध्ये काम केले होते. त्यानंतर जन्नत २ या चित्रपटात तिने काम केले होते. हा चित्रपट चांगला चालला होता. त्यानंतर तिने काही चित्रपटात काम केले. मात्र, आता काम मिळेनासे झाले आहे.
4) स्नेहा उल्लाल : स्नेहा उल्लाल ऐश्वर्याची क्लोन म्हणून बॉलिवुडमध्ये चर्चेली जाते. ऐश्वर्यासारखी हुबेहूब दिसणारी स्नेहा उल्लाल सलमान खान याला पसंत पडली होती. त्यामुळे त्याने त्याच्या लकी चित्रपटात तिला घेतले. मग ती चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तिने सोहेल खान सोबत आर्यन या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती आजारी पडली आणि तिने बॉलिवूडला रामराम केला आहे.
5) ग्रेसी सिंह : ग्रेसी सिंह अतिशय चांगली अभिनेत्री आहे. असे असूनही तिला बॉलिवूडमध्ये आता चित्रपट भेटत नाहीत. आमिर खानचे लगान चित्रपटात तिने सुरुवातीला काम केले आहे. त्यानंतर तिने मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये संजय सोबत काम केले होते. काही वर्षांपूर्वी तिने अजय देवगनचा गंगाजल चित्रपटात काम केले होते. आता मात्र तिला चित्रपट भेटत नाही आहेत.