त्या अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात निर्माण झाला होता अबोला

त्या अभिनेत्यामुळे करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात निर्माण झाला होता अबोला

अंदाज अपना अपना या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स असल्याचे दाखवण्यात आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये अबोला होता. या दोघांमध्ये भांडणे होण्यासाठी एक अभिनेता कारणीभूत होता.

हा अभिनेता दुसरे कोणीही नाही तर अजय देवगण होता. अजय आणि काजोल यांचे आज लग्न झालेले असले तरी तुम्हाला माहीत आहे का काजोल सोबत लग्न करण्याआधी अजयचे रवीना आणि करिश्मासोबत अफेअर होते. अजय आणि रवीना यांचे अनेक वर्षं अफेअर होते.

अजय आणि रवीनाने गैर, दिलवाले, एक ही रास्ता, जंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्यानंतर त्याने रवीनासोबत ब्रेक अप केले. अजयवर रवीना प्रचंड प्रेम करत होती.

त्यामुळे अजय तिच्यापासून दूर गेलेला ती सहनच करू शकली नव्हती आणि तिने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे म्हटले जाते. ब्रेकअपनंतर अजय आणि रवीना हे एकमेकांचे अक्षरशः शत्रू बनले होते. रवीनाने अनेक मुलाखतींमध्ये अजय विरोधात आपले मत मांडले आहे.

अजयने तिला फसवले असल्याचे तिने म्हटले होते. त्यावर रवीनाला मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे अजयने फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत देखील अजय बोलला होता.

त्याने सांगितले होते की, रवीनाला मी प्रेम पत्र लिहिले असल्याचे तिने म्हटले आहे. असे कोणतेच पत्र मी लिहिलेले नाहीत. तिला वाटत असेल तर तिने ही पत्रं खुशाल छापावीत. माझे नाव घेऊन ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने आ त्म ह त्ये चा जो प्रयत्न केला, तोदेखील एक पब्लिसिटी स्टंटच होता.

रवीना आणि करिश्मा यांच्यात तर येवढी भांडणे होती की, त्या दोघी अंदाज अपना अपना या चित्रपटात एकत्र काम करत असल्या तरी फोटोसाठी एकमेकींच्या बाजूला देखील उभ्या राहायला तयार नव्हत्या. रवीना तर याबाबत म्हटली होती की, मी करिश्मा कपूरसोबत फोटो काढला तर मी काही सुपरस्टार बनणार नाहीये.

Team Hou De Viral