करिश्माच्या ‘दिल तो पागल’ या गाण्याच्या व्हिडीओमधील ‘हा’ मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

करिश्माच्या ‘दिल तो पागल’ या गाण्याच्या व्हिडीओमधील ‘हा’ मुलगा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे फिल्मसिटीदेखील बंद आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांचं सारं काम अर्ध्यावर राहिल्यामुळे सध्या चाहते आणि सेलिब्रिटींची भेट होत नसल्याचं दिसून येत आहे.

म्हणूनच अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत आहेत.यामध्येच अभिनेत्री करिश्मा कपूरने तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तिच्यापेक्षा बॅकग्राऊंडमध्ये झळकलेल्या मुलाची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हा मुलगा आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत आहे.करिश्माने शेअर केलेला व्हिडीओ दिल तो पागल है या चित्रपटातील दिल ले गई या गाण्याचा आहे.

यात तिच्यासोबत अनेक बॅकग्राऊंड डान्स असून यात एक मुलगा अनेकांचं लक्ष वेधत आहे. हा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नाही. तर चक्क अभिनेता शाहिद कपूर आहे. शाहिदने त्याच्या करिअरची सुरुवात एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. मात्र आज तो कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

कबीर सिंग या चित्रपटामुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या शाहिदने करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठी कामं केली आहेत. तसंच तो अनेक म्युझिक अल्बममध्येही झळकला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या ताल चित्रपटातही तो लहान भूमिकेत झळला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral