महाभारतात ‘कर्ण’ ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे प्रसिद्ध खलनायक, नाव जाणून आश्चर्य वाटेल

महाभारतात ‘कर्ण’ ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे प्रसिद्ध खलनायक, नाव जाणून आश्चर्य वाटेल

90 च्या दशकात करमणुकीची एक वेगळीच मजा असायची. त्यावेळी टीव्हीवर बरेच कार्यक्रम नव्हते, पण जे पण होते एकदम दमदार होते. त्यावेळी टीव्हीवर फक्त एक-दोन चॅनेल होते, यामुळे लोक त्या चॅनेलला एकदम मन लावून पाहत असे.

आपल्या लक्षात येईल की पूर्वी टीव्हीवर बरेच धार्मिक कार्यक्रमदेखील प्रसारित केले जात होते, आणि त्या कार्यक्रमाचा एक वेगळाच स्वाग असे. आणि त्यापैकी सीरियलपैकी एक म्हणजे बी.आर. चोप्रा यांचे महाभारत हे देखील होते. लोक या महाभारतावर खूप प्रेम करत होते.

बी.आर. चोप्रा यांच्या महाभारतातली प्रत्येक पात्रं लोकांना आवडली होती, मग ती वासुदेव कृष्ण, असो अर्जुन किंवा महर्षी कर्ण असो.या सर्व पात्रांचा अभिनय इतका चांगला होता की ते फक्त एक नाटक होतं असं कधी दिसलंच नाही प्रत्येक पात्रात खरी प्रतिमा दिसत असे.

यामध्ये महारथी कर्ण यांचे पात्र साकारणारे पंकज धीर आपल्या दमदार अभिनय आणि दमदार आवाजाच्या या पात्राने या कार्यक्रमाला चार चांद लावलेले होते आणि हे पात्राचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. हळू हळू पंकज धीर हे चित्रपटांकडे वळले तिथे देखील लोकांना त्यांचे चाहते बनवले.पंकज धीर यांनी सोल्जर, बादशाह, जमीन, टार्झन – द वंडर कार, गिप्पी, अंदाज यासारख्या अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत.

असो, पंकज धीरबद्दल आपणा सर्वांना बरेच काही माहित आहे, परंतु आज आम्ही आपल्याला त्यांच्या मुलाबद्दल सांगणार आहोत, जो सुद्धा वाडीलांप्रमाणे अभिनयात माहिर आहे आणि आजच्या काळात तो फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर दक्षिण इंडस्ट्रीमध्येही सक्रिय आहे. आणि पंकज धीर यांचा मुलगा नेमका कोण आहे ते जाणून घेऊया.

शाहरुखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा हिट चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल त्या चित्रपटाचे खूपच कौतुक झाले होते आणि केवळ चित्रपटाचे नव्हे तर पंकज धीर यांच्या मुलाच्या व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक झाले होते खलनायक थंगबली तुम्हाला माहितच असेल तर तो इतर दुसरा कोणी नसून पंकज धीर यांचा मुलगा आहे.

निकेतनच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलु तर त्याने चेन्नई एक्सप्रेस, जोधा अकबर, मिशन इस्थानबूल, रेडी, दबंग 2, कांचे, हाऊसफुल 3, फ्रेकी अली असे अनेक चित्रपट त्याने केलेले आहेत, निकेतन चित्रपटातशिवाय टीव्ही कार्यक्रमांतसुद्धा खूप सक्रिय आहे. निकेतन धीरची खास बाब म्हणजे त्याने आतापर्यंत बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे, हीदेखील प्रेक्षकांना आवडली आहे.

निकेतन धीरचा जन्म 1987 रोजी मुंबई येथे झाला होता आणि निकेतनने 2008 मध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि येथूनच निकेतनचा बॉलिवूडमधला थरारक प्रवास सुरू झाला..

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral