ही मराठी अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा- होतंय कौतुक

ही मराठी अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा- होतंय कौतुक

सध्या वारकऱ्यांना पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. वारकरी हे दर्शनासाठी निघालेले आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गजानन महाराज यांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गावरून निघालेल्या आहेत. पालखी मार्गावरून आता हे सगळे प्रस्थान करत आहेत.

पालखी मार्गदरम्यान आलेल्या मुक्कामादरम्यान सर्वजण तिथे राहतात त्यामध्ये अनेक जण वारकऱ्यांची भक्ती. भवानी सेवा देखील करतात. कारण वारकऱ्यांना दुसरा कुठलाही निवारा नसतो. सरकार देखील यांना सुविधा देत असते. मात्र, अनेक कलाकार आणि अभिनेते सुद्धा आता या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत.

वारीमध्ये सहभागी होऊन हे कलाकार आता वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांना औषध गोळ्या आणि जेवण्याचे पदार्थ देखील पुरवत आहेत. आता यामध्ये एक अभिनेत्री देखील सहभागी झाली आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वारकऱ्यांमध्ये काही कलाकार सुद्धा वारीमध्ये सहभागी आहेत. यातील काही मराठी कलाकार हे त्यांच्या समाजसेवेसाठी ओळखले जातात. अगदी तसंच मराठी अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णी ही सुद्धा तिच्या वारीमधील समाजकार्यासाठी सध्या खूप चर्चेत आहे. कॅरी ऑन मराठा आणि ढोलकी याबरोबरच इतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

तसेच इतर भारतीय चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिचे वारीतील काही व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत. वारकऱ्यांची सेवा करताना दिसते आहे. तिच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले. तसेच वारकऱ्यांची सेवा करण्याबद्दल कश्मिरा हिने म्हटले, पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोक जीवनातील आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे.

महाराष्ट्रीय जन विश्वाच्या लोक भावनेची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजे पंढरीची वारी होय. तिथे माणसांमधला देव पाहता येतो. माणुसकी सेवाभाव भक्ती आणि आगाध अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो.

अशाच एका वारीचा अनुभव असे अभिनेत्री कश्मीराने म्हटले तरी अगोदरच्या पोस्टमध्ये ती म्हणाली, नमस्कार इंस्टाग्राम वरील माझ्या सर्व मित्र परिवाराला सांगताना आनंद होत आहे की, आपल्या सूचकृती फाउंडेशनच्या वतीने या वर्षी सुद्धा संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या निमित्ताने चहा वाटप, पाणी वाटप, औषधे, मेडिकल कॅम्प, बिस्कीट वाटप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

तरी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती आहे की, आपण आपल्या इच्छेने वारकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा. सूचकृती फाउंडेशन सदैव आपले ऋणी आहे. धन्यवाद असं म्हणत अभिनेत्री कश्मीराने त्याचे या सूचीकृती फाउंडेशनचा बँक अकाउंट नंबर ही शेअर केलाय. कश्मिरा हिने काही वर्षांपूर्वी सूचकृती फाउंडेशनची स्थापना केली.

या फाउंडेशन मार्फतच वारकऱ्यांना औषध, अन्नधान्य, मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा इत्यादी गोष्ट उपलब्ध करून दिल्या जातात. सूचकृती करून अनेक कार्य केले जातात. तशी फाउंडेशन मार्फत वारकऱ्यांची सेवा करते. तिच्या या सामाजिक कार्याचं मोठे कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Team Hou De Viral