लग्नानंतर कतरिनाला गंभीर दुखापत; कुठे होता विकी कौशल?

लग्नानंतर कतरिनाला गंभीर दुखापत; कुठे होता विकी कौशल?

बॉलीवूड मधील सगळ्यात हॉट कपल म्हणून सध्या विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्याकडे पाहिले जाते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे.

राजस्थानच्या सवाईमाधोपुर येथे या दोघांनी थाटामाटात लग्न केले. या लग्नाला मोबाईल देखील आत मध्ये नेण्यास परवानगी नव्हती. याचे कारण म्हणजे या दोघांचा लग्नाचे थेट प्रक्षेपणाचे हक्क तब्बल 88 कोटी रुपयांना त्यावेळेस विकण्यात आले होते. त्यामुळे हे लग्न एकदम हायटेक पद्धतीने झाले.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या आधी सोशल मीडिया तसेच माध्यमांमधून याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. विकी कौशलने ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ यासारख्या चित्रपटामधून आपली ओळख बनवलेली आहे. त्याच्याकडे आगामी काही चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते, तर कॅटरिना कैफ ही मूळची भारतीय नागरिक नसली तरी तिने बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच डंका जमवला आहे.

तिची आई कश्मीरी तर वडील हे पाश्चात्त्य देशातील रहिवासी आहेत. तिला जवळपास सहा बहिणी आहेत. कॅटरिना कैफने कैजाद गुस्ताद याच्या बूम या चित्रपटातून काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अतिशय सुमार दर्जाचा असलेल्या या चित्रपटात तिने प्रचंड किसिंग सीन दिले होते. त्यामुळे देखील तिची मोठी चर्चा त्यावेळेस झाली होती.

बूम या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासह गुलशन ग्रोवर यांचीही भूमिका होती. हा चित्रपट आपण आपल्या आयुष्यात का केला याचा आपल्याला खूप पश्चाताप होत असल्याचे अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तर गुलशन ग्रोवर यांनी देखील एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, कटरीना कैफ हिच्यासोबत मी किसिंग सीन करण्याची तासन्तास प्रॅक्टिस केली होती.

त्यावेळेस कॅटरिना हिने मला अनेकदा चुंबन दिले असे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कटरीना कैफवर सलमान खानची नजर पडली आणि त्याचे नशीबच पालटलं. सलमान खान याने तिला सरकार सारखा चित्रपट मिळवून दिला होता. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. मात्र, असे असले तरी तिने नंतर अनेक चित्रपटात काम केले.

सलमान खानच्या पार्टनर आणि इतर चित्रपटात कॅटरिना दिसली. ती टायगर, टायगर जिंदा है आणि आता टायगर थ्री या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातही कटरीना कैफ दिसणार आहे. कटरीना कैफचा टायगर थ्री चित्रपटाचा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे.

या चित्रीकरणाच्या दरम्यान कटरीना कैफ ही जखमी झाल्याचे वृत्त माध्यमांसमोर आले होते आणि विकी कौशल तिच्याजवळ नव्हता, असे सांगण्यात आलेले आहे. तर आम्ही आपल्याला सत्य परिस्थिती सांगणार आहोत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कटरीना कैफला जखमी अवस्थेतील मेकअप करण्यात आले होते.

तिचे मेकअप केलेल्या जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल झाले. वास्तवात ती कुठल्याही प्रकारे जखमी झालेले नाही. विकी कौशल हा दुसरीकडे चित्रीकरणात व्यस्त असल्याने तिच्या सोबत राहू शकला नाही.

Sayali