केसात चाई पडण्याच्या समस्येने त्रस्त आहात… तर मग हे घरगुती उपाय एकदा करून पहाच..

केसात चाई पडण्याच्या समस्येने त्रस्त आहात… तर मग हे घरगुती उपाय एकदा करून पहाच..

पूर्वीच्या काळामध्ये अन्नधान्यमध्ये प्रचंड जीवनसत्व भरलेले असायचे. मात्र, सध्याच्या जमान्यात सर्वकाही भेसळ पद्धतीने बनवले जाते. यामुळे अन्नधान्य मध्ये देखील मोठ्या प्रमाणात द्रव्यं असतात. त्यामुळे आरोग्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो.

सध्या अनेक तरुणांना टक्कल पडण्याची समस्या असते. तसेच डोक्यामध्ये कोंडा किंवा चाई होत असेल तरच टक्कल पडते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून ही चाई आपण घालू शकता. अनेक तरुण डॉक्टरांकडे जाऊन महागडी औषधे घेतात. मात्र, त्याचा काहीही फायदा होत नाही. काही दिवस चाई निघून जाते. त्यानंतर पुन्हा तसेच होते. त्यामुळे आपण घरगुती उपाय करून ही चाई कमी करू शकता.

1) लसूण कांदा आले लिंबाचा रस : जर आपल्याला डोक्यामध्ये कोंडा किंवा चाई पडण्याची समस्या असेल, तर आपण घरगुती उपाय करू शकता. चार लसणाच्या पाकळ्या कांदा आले आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकत्रित करून घ्या. ज्या ठिकाणी आपल्याला चाई मोठ्या प्रमाणावर आहे, अशा ठिकाणी याची पेस्ट लावावी. हा प्रयोग काही दिवस करावा. यानंतर आपला कोंडा किंवा चाई समस्या कमी होऊ शकते.

2) जास्वंदाची फुले व पाने : जर आपल्या डोक्यामध्ये टक्कल पडलेल असेल आणि आपल्यालाच चाई समस्या असेल तर आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकता. आपल्या घराशेजारी अनेकदा जास्वंदाचे झाड पाहायला मिळते. जास्वंदाची पाने घेऊन आपण याची पेस्ट तयार करावी. ज्या ठिकाणी आपल्याला चाई समस्या आहे, त्या ठिकाणी ही पेस्ट लावावी. हा प्रयोग काही दिवस करावा. काही दिवसानंतर आपल्याला फरक पडलेला दिसेल.

3) मोहरी व खोबरे तेल : आपल्याला डोक्यामध्ये कोंडा किंवा चाई ही समस्या जाणवत असेल तर आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकता. डॉक्टरांचा सल्ला घेण्या आधी हा उपाय केला तर आपले खर्च होणारे पैसे वाचवू शकतात. मोहरी आणि खोबरेल तेल एकत्र करून त्याचे मिश्रण करावे आणि ज्या ठिकाणी आपल्याला डोक्यावर ही समस्या आहे, त्या ठिकाणी तेलाचे मिश्रण लावावे. काही दिवस हा प्रयोग करावा. नंतर फरक पडेल.

4) जमालगोटा बी : आपल्या डोक्यामध्ये कोंडा किंवा चाई समस्या असेल तर आपण आयुर्वेदिक उपाय देखील करू शकता. बाजारामध्ये जमालगोटा बी हे मिळत असते. चांगल्या प्रकारे हे औषध म्हणून घेऊन ज्या ठिकाणी आपल्याल चाई समस्या आहे त्या ठिकाणी हे मिश्रण लावावे. काही दिवसानंतर आपल्या फरक पडलेला जाणवेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral