‘केसतोड’ झालाय मग हे करा घरगुती उपाय करा, आपली ठणक थांबलीस म्हणून समजा..

‘केसतोड’ झालाय मग हे करा घरगुती उपाय करा, आपली ठणक थांबलीस म्हणून समजा..

आपल्याला अनेकदा शरीरावर आणि जखमा होतात. मात्र, त्याचा परिणाम हा आपल्याला जास्त जाणवत नाही. मात्र काही घाव असे असतात की, त्याचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यात आपल्या शरीरावर फोड झाले असल्यास त्याची फार मोठी ठणक लागते. जर आपल्याला कधी केस्तोड झाला असेल तर याची ठणक ही खूप जास्त असते. त्यामुळे वेदना या असह्य होतात.

केसतोड शरीराच्या काही ठराविक भागात असतो. केसतोड हा खांदा, मान, पाठ आणि पृष्ठभागावर होण्याची शक्यता जास्त असते. केस्तोड म्हणजे केसा भोवती होणारा फोड झाल्यानंतर केस हा गळून पडतो आणि त्यानंतर होणारी ठणक ही अतिशय त्रासदायक असते. यामुळे आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करता येतात. तरीदेखील आपण घरगुती उपाय देखील करू शकतात. केस्तोड झाल्यावर त्याचे काही लक्षणे सुद्धा दिसत असतात.

लक्षणे

1) फोड होणे : सुरुवातीला आपल्याला एखाद्या भागावर वेदना व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर हळूहळू त्या भागावर फोड येण्यास सुरुवात होते आणि नंतर आपल्याला या वेदना असह्य होतात.

2) ठणक लागणे : आपल्याला ज्या ठिकाणी फोड झाला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेदना होतात. या वेदना या असह्य होऊ लागतात.

3) गाठ : आपल्या मानेवर खांद्यावर किंवा पृष्ठभागावर एखादी सुरुवातीला गाठ येते. त्यानंतर केस्तोड होण्यास सुरुवात होते.

4) पू होणे : सुरुवातीला ज्या ठिकाणी फोड आला आहे त्या ठिकाणी पू होतो आणि त्यानंतर आपल्याला ताप येऊ शकते. त्यानंतर आपण तातडीने डॉक्टरला दाखवावे.

5) थकवा : जर आपल्याला केसतोड झाला असल्यास थकवा लागत असतो. त्यामुळे लिंबू पाणी किंवा मीठ साखर पाणी सातत्याने द्यावे. अशाने आपला थकवा दूर होतो.

हे करा घरगुती उपाय

1) गरम पाण्याने शेक : जर आपल्याला केसतोडची समस्या झाली असेल तर आपण एका थैलीमध्ये गरम पाणी घ्यावे आणि हा शेक 15 ते 20 मिनिटे करावा. असा प्रयोग काही दिवस करावा. यामुळे केसतोडावर आराम पडण्याची शक्यता असते. त्यानंतरही ही समस्या कमी झाली नाही तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2) हळद : हळदीमध्ये मोठे औषधी गुणधर्म असतात हळद अँटीबॅक्टरियल असते. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला केस्तोड झाला आहे, अशा ठिकाणी हळद लावावी. असे केल्याने आपला केस्तोड हा बरा होतो. हा प्रयोग आपण काही दिवस करू शकता.

3) कडुलिंब : आपल्याला केस्तोड झाला असेल तर आपण कडुलिंबाचा पाला हा आणू शकता. त्यानंतर हा पाला बारीक करून ज्या ठिकाणी केस्तोड झाला आहे त्या ठिकाणी यांचे मिश्रण करून लावावे. असा प्रयोग काही दिवस करावा. आपला केस्तोड हा नाहीसा होण्यास नक्कीच मदत मिळते.

4) लसुन : जर घरामध्ये कोणालाही केस्तोडाची समस्या झाली असेल तर आपण लसुनची पेस्ट करावी. लसणाची पेस्ट करून ज्या ठिकाणी फोड आहे, त्या ठिकाणी लावा हे मिश्रण लावावे. काही दिवस हा प्रयोग करावा. असे केल्याने केस्तोड नाहीसा होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral