‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे ही मराठी अभिनेत्रीला होणार अटक ?, फेसबूक पोस्ट पडली महागात

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे ही मराठी अभिनेत्रीला होणार अटक ?, फेसबूक पोस्ट पडली महागात

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. केतकी चाहत्यांमध्ये तिच्या सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे केतकी अनेकदा अडचणीत सापडली आहे. केतकीच्या वक्तव्यांमुळे ती सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केली जाते.परंतु, यावेळेस केतकीने केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केतकीने फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्जदेखील फेटाळला आहे.१ मार्च २०२० रोजी केतकीने केलेल्या फेसबूक पोस्टमुळे हा वाद निर्माण झाला आहे. केतकीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे.

आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’ असं म्हणत केतकीने विशिष्ट समाजावर आक्षेप घेतला होता. केतकीच्या या विधानावर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नाहीत तर ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे’, असा वक्तव्य केल्यामुळे केतकीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता केतकीवर अस्ट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

ठाणे न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकीला अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Team Hou De Viral