कलाविश्वातुन वाईट बातमी ! KGF चित्रपटातल्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले दुःखद निधन

के जी एफ या चित्रपटामध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या एका कलाकाराचे निधन झाल्याची बातमी सध्या दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधून आली आहे. दक्षिण चित्रपटसृष्टी मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकार हे मृत्युमुखी पडल्याचे आपण पाहिले आहे. काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध दक्षिणात्य कलाकार महेश बाबू यांच्या वडिलांचे देखील निधन झाले होते.
त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णा असे होते. कृष्णा हे देखील दक्षिण चित्रपटामध्ये आघाडीचे असे अभिनेते होते, तर काही दिवसांपूर्वी मराठी, हिंदी, चित्रपटामध्ये अभिनय करणारे विक्रम गोखले यांचे देखील निधन झाल्याची बातमी आपण ऐकलीच असेल. गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकार हे सोडून जात आहेत. केजीएफ चित्रपटामध्ये काम करणारे या कलाकाराचे नाव कृष्णाजी राव असे होते.
कृष्णाजी राव हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णजी राव यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचीच म्हणजे जिंकली होती. त्यांनी अतिशय जबरदस्त असे काम अनेक चित्रपटात केले. मात्र केजीएफ चित्रपटातील त्यांची भूमिका ही विशेष गाजली होती.
कृष्णाजी राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खूपच खराब असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर डॉक्टर उपचार देखील करत होते. केजीएफ चित्रपटांत कृष्णाजी राव यांनी जवळपास 30 चित्रपटामध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णाजी राव यांना फुफुसामध्ये संसर्ग झाल्याने गेल्या काही दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांची प्रकृतीही दिवसेंदिवस दिवस खालावतच होती. कृष्णाजी राव यांचे आता निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय 70 वर्ष होते. केजीएफ चित्रपटामध्ये त्यांनी दमदार अशी भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने दक्षिणात्य चित्रपट सृष्टीसह बॉलीवूडमध्ये देखील एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.