मराठी मालिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रींचे खरे वय, अरुंधतीच वय तर केवळ एवढेच…

मराठी मालिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रींचे खरे वय, अरुंधतीच वय तर केवळ एवढेच…

अनेकदा आपल्या लाडक्या कलाकारांचे वय किती आहे, याबाबत चाहत्यांना माहिती हवी असते. विकिपीडियावर आज सगळीच माहिती उपलब्ध होते. यात बॉलिवूडच्या कलाकारांचे वय आपल्याला सहजगत्या मिळत असते. मात्र, मराठी कलाकारांचे वय लवकरात लवकर सापडणे हे फार अवघड आहे.

कारण विकिपीडियावर हे सगळेच कलाकार उपलब्ध नसतात. यातील काही निवडक कलाकारच यास उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांची वय नेमके किती आहे, याबाबत अनेकांना माहिती जाणून घ्यायचे असते. तर या लेखामध्ये आपल्याला आज आम्ही याबाबतच माहिती देणार आहोत.

1) प्रार्थना बेहेरे – अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने अनेक मालिका आणि चित्रपटात देखील काम केले आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत श्रेयस तळपदे याच्यासोबत दिसत आहे प्रार्थना बेहेरेचे वय 30 वर्षे आहे.

2) दिव्या पुगावकर – दिव्या अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे. तिने देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत. दिव्याचे वय सध्या केवळ पंचवीस वर्षाचे आहे.

3) अन्विता फलटणकर – सध्या छोट्या पडद्यावर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका देखील प्रेक्षकांची चांगलीच मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत काम करणारी अन्विता फलटणकर हीचे वय 23 वर्षे आहे.

4) मधुराणी प्रभुलकर – मधुराणी प्रभुलकर हिने याआधी अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. “नवरा माझा नवसाचा” या चित्रपटात देखील ती दिसली होती. मात्र, सध्या “आई कुठे काय करते” या मालिकेमधून ती एकदम चर्चेत आली आहे. मधुराणी हिचे वय 37 वर्षे आहे.

5) हृता दुर्गुळे – हृता ही देखील अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे. सध्या ती मन उडू उडू झालं या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिचा अभिनय उत्कृष्ट असा झाला आहे. सध्या तिचे वय सत्तावीस वर्ष आहे.

6) गिरिजा प्रभू – गिरीजा प्रभू ही सध्या “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. गिरीजा हिचे वय केवळ 21 वर्ष आहे.

7) आर्या आंबेकर – आर्या आंबेकर हिने सा रे ग म प लिटल चाम्प मधून सर्वांचीच मने जिंकली आहेत. तिने अनेक कार्यक्रमात आणि मालिकात काम केले आहे तिचे वय सत्तावीस वर्ष आहे.

8) रेश्मा शिंदे – रेश्मा शिंदे ही देखील अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री आहे. रेश्मा हिने रंग माझा वेगळा या मालिकेत काम केले आहे तिचे वय 34 वर्षे आहे.

9) श्वेता खरात – झी मराठीवर सध्या मन झालं बाजींद ही मालिका प्रेक्षकांचा चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये श्वेता खरातने चांगली भूमिका साकारली आहे. श्वेता खरातचे वय 25 वर्षे आहे.

10) समृद्धी केळकर – समृद्धी केळकर हीदेखील अतिशय उत्कृष्ट अशी अभिनेत्री असून ती सुगंध मातीचा या मालिकेतील झळकत आहे. तिचे वय सध्या 26 वर्षे आहे.

Team Hou De Viral