ब्रेकअपने ती आतून इतकी तुटली की तिने डायरेक्ट इंडस्ट्रीच सोडली आणि आता जगत आहे असे आयुष्य

किम यशपाल ही एक ८० च्या दशकाची नायिका होती जिला मोठ्या स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण जेव्हा स्वतःच चमकण्याची वेळ आली तेव्हा ती कोठे गायब झाली हे कोणाला ठाऊक नव्हते.
जरी लोक किमला नावाने ओळखत नाहीत, पण ‘जिमी जिमी आजा आजा’ हे गाणे ऐकून त्यांच्या आठवणी नक्कीच ताज्या होतात. अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्यानंतर ती कुठे आहे कोणाला काही माहिती नव्हते.आता किमचा लेटेस्ट फोटो असलेला एक ट्विट खूप व्हायरल होत आहे.
जिमी जिमी आजा आजा हे गाणे डिस्को डान्सर या चित्रपटातील आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होता आणि तो त्यावेळी सुपरहिट होता. डिस्को डान्सरच्या आधी किम ‘नसीब’ आणि ‘फिर वही रात’ मध्ये दिसली होती. किमची चित्रपट कारकीर्द त्या काळात शिगेला पोहोचली होती.
किम यशपाल राजेश खन्ना, डेनी डेन्झोंगपा, शत्रुघ्न सिन्हा अशा बर्याच मोठ्या स्टार्सबरोबर काम करत होती. त्यावेळी किमची कारकीर्द अगदी बरोबर मार्गावर चालली होती, परंतु तरीही ती खऱ्या आयुष्यातला जीवनसाथी शोधत होती. तिचा शोधही पूर्ण झाला होता. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डेनीने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला होता आणि जेव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा कोणालाही ठाऊक नव्हते.
त्यानंतर डेनी आणि किमसुद्धा ७ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. १९८० मध्ये अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि ते एकमेकांपासून विभक्त झाले. ब्रेकअपनंतर डेनी आपल्या आयुष्यात पुढे गेला आणि किम इंडस्ट्रीतून गायब झाली.
वर्षानुवर्षे किम कोठे आहे हे कोणालाही ठाऊक नव्हते. तिचा मृ त्यू झाल्याची बातमीसुद्धा आली. पण तिच्या सोशल मीडिया हँडलवरून असे दिसून आले आहे की ती मुंबईत एक साधे जीवन व्यतीत करत आहे. फेसबुकवर किमची शेवटची पोस्ट 2014 ची आहे.
अलीकडेच तिचा एक फोटो ट्विटरवर खूप व्हायरल होत असून, त्यामध्ये तिच्या जुन्या फोटोसह २०१६ चा फोटो दर्शविला जात आहे.