‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्याच्या प्रेमात…

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री  लोकप्रिय अभिनेत्याच्या प्रेमात…

सध्या छोट्या पडद्यावर गेल्या वर्षी देव माणूस मालिकेने सर्व मालिकांना मागे सोडले होते. काही आठवड्यांपूर्वी एक टीआरपी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये देव माणूस ही मालिका एक नंबरला असल्याचे सांगण्यात आले होते.

ही मालिका सत्यघटनेवर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांना ती प्रचंड भावत होती. पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरामध्ये डॉक्टर अजित कुमार देव हा राहत असतो आणि त्याने आपल्या बोलण्यातून अनेक लोकांना फसवलेले असते. उपचार करण्याच्या नावाखाली तो लोकांवर अत्याचार करत असतो. त्याच्या फार्महाऊसवर त्याने 6 जणांना जिवंत गाडून ठेवलेले असते.

यासाठी त्याला डिंपल नावाची नर्स देखील मदत करत असते. हे प्रकरण काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी या डॉक्टर संतोष कुमार पोळ याला अटक केली आहे. सत्य घटनेवर आधारित देव माणूस मालिका साकारण्यात आली आहे. देव माणूस मालिकेत अजित कुमार देव या बोगस डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारलेली होती.

यापूर्वी देखील किरण गायकवाड ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील नकारात्मक भूमिकेत दिसला होता. देव माणूस मालिकेतील भूमिका देखील त्याची प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, खऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या आईला याचा खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते. कारण तो मालिकेत नकारात्मक भूमिका करतो.

किरण गायकवाड याची आई जिथे जाते तिथे तिला तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की, तुझ्या मुलाला जरा समजावून सांग. अशा भूमिका करू नको. यामुळे चांगले होणार नाही. मात्र, माझी आई त्यांना समजावून सांगते की, असे काही नसते. तो मालिकेत केवळ नकारात्मक भूमिका करतो, एरवी तो खूप चांगला माणूस आहे.

‘लागीरं झालं जी’ या मालिकेत किरण याने भय्यासाहेब ही भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळाले होते. या मालिकेतील किरणची सहकलाकार पूर्वा शिंदे हिच्यासोबत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘लागीरं झालं जी’मध्ये दोघेही नवरा-बायकोच्या भूमिकेत होते. पण सध्या त्यांच्या या रोमॅन्टिक व्हिडिओची जोरात चर्चा सुरू आहे.

एकूणच काय तर किरण गायकवाड आणि पूर्वा शिंदे आता एकमेकांच्या प्रेमात पडले की काय इथपर्यंत देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत, तर आपल्याला गायकवाड याने साकारलेली कुठली भूमिका आवडते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral