‘तुझं तू आता पाहून घे’, विकास सावंत आणि किरण माने यांच्यात मोठे भांडण

‘तुझं तू आता पाहून घे’, विकास सावंत आणि किरण माने यांच्यात मोठे भांडण

कलर्स मराठी या वाहिनीवर बिग बॉस हा शो सुरु होऊन आता जवळपास दोन आठवड्याचा कालावधी लोटला आहे. आता दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये सगळेच स्पर्धक हे या शोमध्ये रमले आहेत. मात्र या शोमध्ये आता वादावादीचे प्रसंग देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.

बिग बॉस शो ज्यावेळेस सुरू झाला होता त्या दिवशी पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली होती. या वादावादी मध्ये काही जणांनी मध्यस्थी केली. मात्र, नंतर हा वाद वाढतच गेला. अपूर्वा नेमळेकर ही अतिशय आक्रमक झाली होती.

त्यानंतर अपूर्वा नेमळेकर हिने घरातील सगळ्यात दिग्गज असलेले स्पर्धक किरण माने यांच्या सोबतही एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला होता. त्यामुळे देखील अनेक जण तिच्यावर संतापले होते. त्यानंतर चावडीवर महेश मांजरेकर यांनी देखील अपूर्वा नेमळेकर हिला चांगले सुनावले होते. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर ही सुधारेल असे वाटत होते.

मात्र असे काही झाले नाही. त्यानंतरही अपूर्वा नेमळेकर ही आपल्या विचित्र वागणुकीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. मात्र आता ती काहीसा वेगळा खेळ खेळत असल्याचे देखील दिसत आहे. मध्यंतरी बिग बॉसच्या घरामध्ये अनेक जणांचे भांडण देखील झालेले पाहायला मिळाले. एका टास्क दरम्यान एकमेकांचे दात पाडण्याची भाषा देखील झाली होती.

त्यानंतर बिग बॉसने स्पर्धकांना चांगले झापुण काढले होते आणि त्यांना हा खेळ कसा खेळावा याबाबतही सांगितले होते, तर आता बिग बॉस मध्ये खऱ्या अर्थाने रंगत चढत चालली आहे, असे म्हणावे लागेल. बिग बॉसच्या घरामध्ये आता उरलेले सदस्य हे वेगळ्या पद्धतीने खेळ खेळताना दिसत आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये आता एक नवीन वाद समोर आल्याचे दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आता किरण माने आणि विकास सावंत यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा प्रोमो नुकताच समोर आला असून लवकरच हा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. किरण माने आणि विकास सावंत हे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत, त्यावेळेस इतर सदस्य देखील तेथे उपस्थित आहेत.

विकास सावंत हा किरण माने यांना बोलताना दिसत आहेत की, तुम्ही माझी साथ का सोडली, ज्यावेळेस मला तुमची गरज आहे. त्यावेळेस तुम्ही माझ्या बाजूने बोलत का नाही असे म्हणत आहे आणि रडायला लागत आहे. त्यावर किरण माने म्हणत आहेत की, मी तुला एवढे दिवस साथ दिली. खूप झाले, मात्र आता माझा मला वेगळं व्हायचं आहे.

तुझं तू आता पाहून घे, असे म्हणतात. त्यावर विकास सावंत हा रडताना दिसत आहे. त्यानंतर किरण माने यांनी त्याला आपल्या जवळ घेतले आणि तो मोठ्याने रडायला लागलेला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या शोमध्ये आपल्याला हा एपिसोड लवकरच दिसणार आहे.

Team Hou De Viral