‘ती बाई एक नंबरची…’, अरे अरे हे काय बोलून बसले तिच्याबद्दल ‘किरण माने’

‘ती बाई एक नंबरची…’, अरे अरे हे काय बोलून बसले तिच्याबद्दल ‘किरण माने’

कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस या शोमध्ये आपल्याला या वेळेस किरण माने यांच्यासारखा दिग्गज कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरण माने यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. किरण माने हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आहेत.

किरण माने यांनी मध्यंतरी मुलगी झाली हो ही मालिका सोडली होती. मुलगी झाली हो या मालिकेच्या सेटवर त्यांचा प्रचंड वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर त्यांनी या मालिकेच्या निर्मात्यांवर खूप आरोप लावले होते आणि आपल्या सोबत राजकारण झाले होते, असे त्यांनी म्हटले. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली होती.

आता ती बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाली आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी अनेकांना पाठिंबा देण्याचे धोरण देखील पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात आता देखील नवीन वाद झाल्याचे समोर येत आहे. या घरात अनेकाचे भांडण होत असल्याचे समोर आले आहे.

बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य आता घराबाहेर पडले आहेत पहिला सदस्य हा निखिल राज शिर्के होता. त्यानंतर आता नुकतीच मेघा घाडगे ही देखील या घराच्या बाहेर पडली आहे. मेघा घाडगे ही देखील घराबाहेर पडल्यानंतर किरण माने योगेश जाधव यांच्या बद्दल गंभीर आरोप केले आहेत. योगेश जाधव हा दिसतो तसा नाही. तो कायमच पैशाबद्दल बोलत असतो.

मला तो नाचून दाखवते का? असे म्हणाला होता. त्याचबरोबर मला एक लाख रुपये दे मी तुझ्या बाजूने बोलतो असा आरोप देखील मेघा घाडगे यांनी केला होता. तसेच किरण माने यांच्यावरही मेघा यांनी आरोप केले होते. मेघा विरोधात कटकारस्थान करण्यासाठी किरण माने यांनी भडकवले होते, असे तिने म्हटले होते.

तर आता बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळेच वळण पाहायला मिळत आहे. विकास सावंत आणि किरण माने यांच्यामधील गट्टी ही आपण पहिलीपासूनच पाहत आहोत. आता किरण माने हे विकास सावंत याला अमृता देशमुखच्या विरोधात भडकवताना दिसत आहे. अमृता जशी दिसते तशी नाही, तुला ती गोड गोड बोलून हे सगळे हित साधून घेत आहे.

तुला कसे समजत नाही, असे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे किरण माने यांच्या मनात नेमके काय चालले हे पाहणे फार औसुक्याचे ठरणार आहे.

Team Hou De Viral