‘किरण माने’ च कपटी कारस्थान, ‘बिगबॉस मराठी’ च्या घरात ‘विकास पाटील’ ला भडकावुन लावून दिले मोठे भांडण

कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेली मराठी बिग बॉस ही मालिका आता रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण की या मालिकेमध्ये अनेक वादग्रस्त स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये किरण माने यांचे नाव देखील आपल्याला घेता येईल. किरण माने आता या शोमध्ये काही जणांना भडकवत असल्याचे समोर आले आहे.
मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आले होते. किरण माने राजकीय भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने यांनी त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली.
या वेळी आपण आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली असल्याचे किरण माने यांनी सांगितले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपल्याला न्याय देण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले होते. मुलगी झाली हो मालिका प्रेक्षकांना आवडत असतानाच मालिकेला असा धक्का बसला होता. एखाद्या व्यक्तीला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो असे देखील त्यांनी सांगितले आहे.
मात्र, असे असूनही त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या आधी देखील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अनुपम खेर कंगना राणावत यांच्या सारख्या अभिनेत्यांनी देखील राजकीय भूमिका घेतली. मात्र, त्यांच्यावर कोणीही काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे माने यांच्या समर्थनात अनेक जण उतरले होते.
आता किरण माने कलर्स मराठी वरील बिग बॉस या शोमध्ये सहभागी झाले आहेत. अलीकडे त्यांचा आणि अपूर्वा नेमळेकर यांचा प्रचंड वाद झाल्याचे देखील समोर आले होते. अपूर्वा हिने किरण माने यांना चांगलीच झापून काढले होते. नुकताच याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये किरण माने हे विकास पाटील याला भडकवत असल्याचे दिसत आहे.
अरे तुला किती जण हे राबवून घेत आहेत. इकडला डाग काढ, तिकडला डाग काढ यांच्या मनावर डाग पडले आहेत. आता तू अजिबात ऐकून घ्यायचे नाही. तू देखील लढ्याचे असे ते विकास पाटील याला म्हणत आहेत. गेल्या चार दिवसापासून तुला हे लोक त्रास देत आहे.
तू कशाला ऐकून घेतो, असे म्हणत आहेत. त्यामुळे आता विकास पाटील आगामी काळात काय भूमिका होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.