किरण माने जाणार बिगबॉस च्या घराबाहेर, हा अभिनेता काढणार त्यांना बाहेर

किरण माने जाणार बिगबॉस च्या घराबाहेर, हा अभिनेता काढणार त्यांना बाहेर

कलर्स मराठी वरील बिग बॉस या शोमधून निखिल राज शिर्के हा नुकताच बाहेर पडला आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये तो बाहेर पडला आहे. निखिल हा घरा बाहेर पडल्यानंतर अनेक जणांनी त्याच कौतुक केले आहे. निखिल होता, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नव्हता. तो अतिशय चांगला माणूस होता, असे सगळेजण म्हणतात.

मात्र, निखिल हा घराबाहेर पडल्यानंतर त्याने आता एक मोठे वक्तव्य केले आहे. त्याने किरण माने यांच्याबाबत हे वक्तव्य केले आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती सांगणार आहोत. दोन ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर बिग बॉसचे चौथे सत्र सुरू झाले आहे. या चौथ्या सत्रामध्ये आपल्याला अनेक कलाकार हे सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

या शोमध्ये अनेक भांडणे, मारामाऱ्या होताना देखील दिसत आहेत. नुकताच योगेश जाधव हा स्पर्धकांवर भडकल्याचे दिसत आहे. मेघा घाडगे हिच्या सोबत त्याचा प्रचंड वाद झाल्याचे देखील समोर आले आहे. याबाबतचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये योगेश हा प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. त्याला अनेक जण रागावताना देखील दिसत आहेत.

त्यावर योगेश हा तुमच्या बापाचे खातो का? असे म्हणताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात आधी अपूर्वा नेमळेकर हिचा आणि प्रसाद जवादे यांचा प्रचंड वाद झाल्याच समोर आले होते. या दोघांचे प्रचंड भांडण झाले होते. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर हिने किरण माने यांना देखील एकेरी भाषेत टोमणे मारले होते.

या सर्वांवर मग महेश मांजरेकर यांनी आठवड्याच्या चावडीवर अपूर्वा नेमळेकर हिला चांगले सुनावले होते. आता निखिल हा या शोच्या बाहेर पडला आहे. निखिल बाहेर पडल्यानंतर तो अनेक वक्तव्य करताना दिसत आहे. ज्या दिवशी तो घराच्या बाहेर पडला, त्या दिवशी बिग बॉसच्या घरामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळाले.

महेश मांजरेकर यांचे आभार, असे त्याने सोशल मीडियावर सांगितले होते. मात्र, त्याने आता नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये त्याने किरण माने यांना आपले लक्ष केले आहे. किरण माने हे काला कवा आहे, असे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर विकास सावंत हाच किरण माने यांना घराच्या बाहेर काढेल, हे त्याने ठामपणे सांगितले.

तर आता निखिल याच्या या मतावर आपण सहमत आहात का? बिग बॉस मधील कुठला कलाकार आपल्या सगळ्यात जास्त आवडतो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral