फुल्ल पब्लिक मध्ये ‘किस’ करत ‘या’ अभिनेत्यांनी उडवली होती खळबळ, फोटो झाले होते व्हायरल

व्हॅलेंटाईन वीक चालू होत आहे; कपल्स आता ‘किस डे’ ची वाट पाहत असतील. प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे किस. ‘किस’ च्या माध्यमातून आपण आपल्या जोडीदारास तो आपल्यासाठी किती विशेष आहे याची जाणीव करून देत असतो.
बॉलिवूडमध्ये ‘किसिंग’ सामान्य आहे, बॉलिवूडमधील अनेक स्टार सार्वजनिक ठिकाणी किस केल्याने चर्चेत आले आणि त्यात लिप-लॉक किस केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. चला आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड स्टार्सविषयी सांगतो ज्यांनी सर्वांसमोर एकमेकांस किस केले…
१) राखी सावंत आणि मिक्का सिंग – आपणा सर्वांना मिक्का सिंग आणि राखी सावंत यांचा किसिंग सीन आठवत असेल. मिक्काने राखीचे चुंबन घेतल्याने अचानक ते वादात सापडले होते.मिक्काने अचानक राखीला आपल्या हातात घेतले आणि ओठांना ओठांनी किस केले. या सीनने सगळे आश्चर्यचकित झाले होते.
२) ऐश्वर्या राय आणि अजय देवगन – अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांनी किस तेव्हा केला जेव्हा त्यांचे जोडीदार त्यांच्या सोबत होते. फोटोत आपण पाहु शकता की अभिषेक बच्चन आणि काजोलसुद्धा तिथे आहेत. दोघे एकमेकांशी बोलत आहेत, तर अजय देवगन आणि ऐश्वर्या राय बाजूला लिप-टू-लिप किस करत आहेत. त्या फोटोबद्दल सांगण्यात येत आहे की, भेटत असताना दोघांचे ओठ एकमेकांशी भिडले, त्यादरम्यान कॅमेरामॅन ने त्यांचा फोटो क्लिक केला. ‘पा’ या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये हे चौघेजण दाखल झाले होते.
३) अमिताभ बच्चन आणि जया बच्चन– सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचा हा फोटो अप्रतिम आहे. फोटोत दोघेही एकमेकांना चुंबन घेताना दिसत आहेत. फोटो एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील आहे. यादरम्यान, अमिताभ आणि जया यांनी एकमेकांचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले.
४) पूजा भट्ट आणि महेश भट्ट – दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्याचीच मुलगी पूजा भट्ट यांनी लिप टू लिप किस केल्याचा एक फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चेचा विषय बनला होता. या फोटोबाबत बरेच वादंग झाले. फोटोमध्ये पूजा भट्ट आणि महेश भट्ट लिप टू लिप काय करतात हे आपण स्पष्टपणे पाहू शकता. या फोटोमुळे नवीन वादाला तोंड फुटले होते.
५) प्रियांका चोप्रा आणि निक जोनास – प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी किस करताना पाहिले आहे.तुमच्या माहितीसाठी चाहत्यांनीही त्यांच्या जोडीबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले कारण प्रियंका चोप्रा निकपेक्षा खूपच मोठी आहे, यामुळे ही जोडी चाहत्यांना हव तस समाधान देत नाही.
या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रियंका आपले वैवाहिक जीवन आनंदाने आयुष्य जगत आहे. कोणताही कार्यक्रम असो वा पार्टी असो… बहुतेकदा त्या ठिकाणी ते एकमेकांना चुंबन घेताना दिसतात.