जबरदस्त गुणांनी युक्त आहे कीवी फळ, कमी कॅलरीत शरीराला करतं मजबूत

आपण कीवी फळाबाबत तर अवश्य ऐकलं असेल. हे फळ जितकं स्वादिष्ट आहे, त्याहून अधिक शरीरासाठी फायदेशीर आहे. डेंग्यू सारख्या आजारांपासून लढण्यासाठीही हे फळ महत्त्वाचं काम करतं. जर आपण आता सुद्धा कीवी खाणं सुरू केलं नाही, तर त्याचे फायदे वाचून नक्की सुरू कराल.
जाणून घ्या कीवी आपल्या शरीरासाठी का आहे फायदेशीर?
तसं तर सफरचंदपासून तर डाळिंबापर्यंत प्रत्येक फळ आरोग्यासाठी फायदेशीर असतं. मात्र कीवी यासर्वांमध्ये एक पाऊल पुढे आहे. कारण यात असलेलं फायबर आपली पचनशक्ती वाढविण्याचं काम करते. नियमितपणे कीवी खाल्ल्यास आपण उत्साही आणि स्लीम राहू शकता.
यात आढळणाऱ्या मिनरल्समुळे कँ-सर सारख्या आजारांमध्ये पण कीवी खाण्यास सांगितलं जातं.कोरोना व्हायरसच्या या काळात आपली इम्यून सिस्टम मजबूत करण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कीवी आपली इम्यून सिस्टम पण मजबूत करतं. मानसिक त्रासातून दूर करण्याचं कामही कीवी करं. सोबतच बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून आपलं रक्षण करण्याचं काम कीवी करतं.
जाणून घ्या कीवी फळाचे अधिक फायदे
कीवी फळ नियमित खाल्ल्यास आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ निघून जाण्यास मदत होते. यामुळे आपली त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या पण दूर राहतात.
पोटातील उष्णता कमी करण्याचं काम पण हे फळ करतं. अल्सर सारख्या गंभीर समस्यांपासून आपली सुटका होते.
यात आयरन आणि फॉलिक ऍसिड पण असतं, त्यामुळे गर्भवती महिलांसाठी कीवी स्वर्गीय फळापेक्षा काही कमी नाही.
कीवीच्या गुणांची यादी खूप मोठी आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी कीवीचं नियमित सेवन रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण कमी करतं आणि सारखेचं प्रमाण योग्य राखतं.
जर आपल्याला गुडघ्याचं दुखणं असेल, हाडांमध्ये दुखत असेल तर आपण आपण कीवीचा आपल्या आहारात अवश्य समावेश करावा.कीवीमधील प्रमुख गुणकारी तत्त्वं कोणते ते पाहा
कीवीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं
असा दावा केला जावू शकतो की, केळातही तेव्हढंच पोटॅशिअम असतं जितकं की कीवीमध्ये, मग तरीही कीवी का खायचं? तर उत्तर आहे कॅलरीज. आज आपण जेवणात कॅलरीज मोजतो, म्हणून कीवी फिटनेस फ्रिक लोकांची पहिली पसंत ठरतं.
केळीच्या तुलनेत कीवीमध्ये कॅलरीजचं प्रमाण अर्ध असतं. कमी कॅलरी असल्यामुळे हृदयासाठी पण ते फायदेशीर ठरतं. ब्लड प्रेशर योग्य राखण्यात याचा फायदा होतो. तसंच भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे, डॉक्टरही त्याचा उपयोग करण्यास सांगतात. संत्र्यांच्या तुलनेत कीवीमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण दुप्पट असतं.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.