इतक्या करोडो रुपयांची संपत्ती सोडून गेला सिंगर के.के, आकडा ऐकून डोळे चक्रावून जातील..

इतक्या करोडो रुपयांची संपत्ती सोडून गेला सिंगर के.के, आकडा ऐकून डोळे चक्रावून जातील..

आपल्या गोड मधून आवाजाने सर्वांची मने जिंकणारे गायक केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केके यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण संगीत जगताला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

केके यांनी 100 हून अधिक गाणी गायली होती आणि केवळ हिंदी भाषेतच नाही तर तमिळ, तेलगू, गुजराती भाषांमध्येही गाणी गायली होती. केके दिल्लीचे रहिवासी होते आणि त्यांनी दिल्लीतूनच ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते, यासोबतच केके यांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून गाणे गाण्याची खूप आवड होती आणि त्यांनी या क्षेत्रातही करिअर केले आणि त्यात ते सक्सेस देखील झाले.

के.के. यांच्या सुरेल आवाजाने संगीताच्या दुनियेत एकापेक्षा एक गाण्यांचा आगळा वेगळा खजिनाच त्यांनी तयार केला होता आणि आज त्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. केकेने आपल्या शानदार कारकिर्दीत खूप यश मिळवले होते आणि त्यामुळेच ते प्रचंड संपत्तीचे मालक देखील होते.

रिपोर्ट्सनुसार, केके हे 50 कोटींच्या मालमत्तेचे मालक होते. केके लाइव्ह कॉन्सर्टसाठी 10 ते 15 लाख फी घेत असे आणि याशिवाय एका गाण्यासाठी 4 ते 5 लाख फी घेत असे. केके यांना गाड्यांची खूप आवड होती आणि त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचा मोठा संग्रह होता.

त्यांच्या महागड्या कारमध्ये जीप, मर्सिडीज बेंझ ए क्लास, ऑडी आरएस 5 इत्यादींचा समावेश होता. त्यांनी यावर्षीच ऑडी आरएस 5 खरेदी केली आणि त्याचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. केके यांची पत्नी ज्योती कृष्णा आणि त्यांची दोन मुले तमारा आणि नुकुल हे आता त्यांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

केके यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वच मोठ्या सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Team Hou De Viral