त्या दोघांत काहीतरी शिजतंय ? फोटोंमुळे ह्या क्रिकेटपटू व तिच्या संबंधाबाबत आलंय चर्चेला उधाण

त्या दोघांत काहीतरी शिजतंय ? फोटोंमुळे ह्या क्रिकेटपटू व तिच्या संबंधाबाबत आलंय चर्चेला उधाण

लोकेश राहुलनं अखेर बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचे कबुल केलं. लोकेश राहुल व अथिया दोघंही लंडनमध्ये आहेत आणि सोशल मीडियावरील त्यांच्या कॉमन फ्रेंडमुळे ही दोघं एकत्रच राहत असल्याचे समोर आले आहे. त्यात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत नेण्याची मुभा दिली होती. त्यामुळे संघातील बहुतेक खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसोबत इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो बबलमध्ये हे सर्व राहत आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं खेळाडूंकडे त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मागितली होती. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार लोकेश राहुलनं त्यात अथियाला आपली गर्लफ्रेंड असल्याचे बासीसीआयला कळवल्याचे वृत्त समोर येत आहे. या दोघांनी अद्यापही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, सोशल मीडियावरील त्यांच्या अनेक पोस्टमुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा मात्र रंगली आहे.

”मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी लोकेश राहुल व अथिया दोघंही एकत्र इंग्लंडसाठी रवाना झाले. इंग्लंडसाठी रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयच्या लॉजिस्टीक विभागानं खेळाडूंकडून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावे विचारली. तेव्हा खेळाडू त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत जात आहेत, का कळवणे अपेक्षित होतं.

तेव्हा लोकेश राहुलनं अथिया शेट्टी ही त्याची पार्टनर असल्याचे सांगितले. त्याच बायो बबलमधून ती इंग्लंडमध्ये दाखल झाली अन् संघासोबतच साऊदॅम्प्टन येथे राहत आहे,”असे सूत्रांनी HT ला सांगितले.

Team Hou De Viral