अखेर के एल राहुल अन् अथिया शेट्टीच्या विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

अखेर के एल राहुल अन् अथिया शेट्टीच्या विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बॉलिवूडपासून क्रिकेट इंडस्ट्रीपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा होती. या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अथिया आणि राहुल अखेर लग्नबंधनात अडकले. 23 जानेवारी रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर या दोघांचे लग्न झाले आहे. यासह सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी केएल राहुलची वधू झाली आहे.

अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी मीडियाला भेटायला आले आहेत. त्याने पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता घातला आहे. सुनीलसोबत त्याचा मुलगा अहान शेट्टीही दिसला. दोघांनी पापाराझींना मिठाई देखील दिली आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरही पोहोचले होते.

पाहुण्यांच्या यादीतही त्यांचे नाव होते. नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनुपम आले होते. याशिवाय अथियाची फ्रेंड आणि स्टार किड्स कृष्णा श्रॉफ आणि अंशुला कपूरही लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. अर्जुन कपूर देखील बहीण अंशुला कपूरसोबत या जोडप्याच्या लग्नात सहभागी झाला होता. अर्जुन आणि अंशुला संगीत सेरेमनीमध्येही दिसले होते.

कृष्णा ही जॅकी श्रॉफची मुलगी आहे. सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती खंडाळ्यात अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाला उपस्थित होते. अथिया आणि केएल राहुल हे अगदी इंटिमेट पद्धतीने लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते.

अथिया आणि केएल राहुलने त्यांच्या खास दिवसासाठी लाल नव्हे तर पांढरा आणि सोनेरी रंगाचा वेडिंग ड्रेस फायनल केला आहे. अथिया आणि केएल राहुलचे वेडिंग आऊटफिट हे सब्यसाचीचे आहे. क्रिकेटर इशांत शर्मा देखील अथिया आणि केएल राहुलच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नात नो फोन पॉलिसी ठेवण्यात आलेली होती. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ लीक होऊ नयेत, हे लक्षात घेऊन सर्व लोकांच्या फोनच्या कॅमेऱ्यांवर स्टिकर्स लावण्यात आले होते.

सुनील शेट्टी यांनी घराबाहेर उपस्थित पत्रकारांसाठी जेवण आणि थंड पाण्याची व्यवस्था देखील केली होती. आपली मुलगी अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे कव्हरेज करण्यासाठी तिथे पोहोचलेल्या सर्व मीडियावाल्यांची काळजी घ्यावी, अशी सुनील शेट्टीची इच्छा होती. काल रात्री संगीत समारंभानंतर सुनील शेट्टीने सर्व पापाराझींना चिकन बिर्याणी खाऊ घातली.

रविवारी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा संगीतचा कार्यक्रम झाला. या जोडप्याने लग्नात नो फोन पॉलिसी ठेवली आहे. कोणत्याही अतिथीला फोन घेऊन जाण्याची परवानगी नाही. पण तरीही लग्नाच्या ठिकाणाहून या जोडप्याच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Team Hou De Viral