मराठी चित्रपट सृष्टी हादरली; प्रसिद्ध गीतकारचे दुःखद निधन

मराठी चित्रपट सृष्टी हादरली; प्रसिद्ध गीतकारचे दुःखद निधन

मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटकांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक धक्के बसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ या जाहिरातींमध्ये काम करणारे दिनकर करमरकर यांचे देखील निधन झाले.

त्यांचे वय जवळपास 96 वर्षांचे होते. त्याचप्रमाणे मराठीतील विख्यात गायिका कीर्ती शिलेदार यांचे देखील नुकतेच निधन झाले आहे. तर अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोळी गीतांमध्ये अग्रेसर असलेले एक एक गायक यांचे देखील नुकतेच निधन झाले आहे.

तसेच देशाच्या गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर देखील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्याबद्दलही अफवा सगळीकडे पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

वेसावरची पारू फेम सुप्रसिध्द लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी गीतांचा बादशाह अशी ओळख असणारे शहर काशीराम लक्ष्मण चिंच यांचे नुकतेच पहाटे दुःखद निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा मुलगा सचिन तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते.

उपचारासाठी त्यांना ब्रह्मकुमारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारांची अधिक असल्याने त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान रविवारी पहाटे श्वास घेतला. कोळी- आगरी पारंपरिक गाणे त्यांनी सातासमुद्रापार नेले. त्यांनी गायलेली कोळी गाणी सर्वांना नाचायला भाग पाडतात.

वेसावची पारू, दर्या भरला असे अनेक लोकप्रिय गीत गायले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्यांच्या मुंबई भेटीत काशीराम यांनी गायलेली ‘मी हाय कोली’ या गाण्यावर बच्चेकंपनी सोबत डान्स केला होता. ही आठवण आजही ताजी आहे.

कोळी गीतांचा खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून देणारे काशीराम यांच्या निधनाने संपूर्ण संगीत जगतात आणि आगरी कोळी बांधवांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी चिंच यांच्याविषयी भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Seema