केसांमध्ये कोंडा झालाय, फक्त 2 चमचे ही पेस्ट केसांना लावा आणि कमाल बघा

केसांमध्ये कोंडा होणे, सध्याची सामान्य समस्या बनली आहे. केस नीट न धुणे, वेगवेगळे हेअर जेल, क्रीम, शाम्पू आणि अनेक केमिकल युक्त उत्पादने वापरल्याने केसात मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा होऊ नये, तसेच अन्य समस्यांपासून वाचण्यासाठी केसांची विशेष निगा राखावी लागते.
तसेच केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करणे टाळावे. केमिकलयुक्त उत्पादनांचा प्रभाव काही काळ राहतो,मात्र ही उत्पादने केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. केसांमध्ये कोंडा झाल्यास खाज येऊ लागते. केसांच्या त्वचेवर अधिक खाजवल्यास जखमाही होऊ शकतात. यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. केसांमध्ये कोंडा आणि खाज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
केसातील कोंडा दूर करण्याचे सोपे उपाय
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे केस विंचरणे महत्त्वाचे असते. यामुळे केसांच्या मुळातून तेल निघते. याशिवाय केस नियमित विंचरल्याने केसांची वाढही होते. कोंडा झाल्यास चांगल्या प्रतीचा शाम्पू वापरावा. अशा हेअर प्रॉडक्टचा वापर करा ज्यामध्ये झिंक पॅराईथिन असते. कोंडा दूर करण्यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो.
कोरफडाच्या रसाने केसांना मसाज करा आणि एका तासाने केस धुवा. असे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते. नारळाच्या तेलात कापूर मिसळून ठेवा. आंघोळ करण्याआधी केसांना या तेलाने मसाज करा. नियमितपणे हे केल्याने कोंड्याची समस्या दूर होते.
एक ग्लास पाण्यात चार चमचे बेसन मिसळून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना लावून एक तास ठेवा त्यानंतर केस धुवा. हा उपाय साधा आणि फायदेशीर आहे. दोन चमचे बेकिंग सोडा आणि दोन चमचे पाणी एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना लावून १५ मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास मदत होईल.
पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळून केसांना लावा. यामुळे कोंडा दूर होईल.कडुनिंबाची पाने नीट वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. हा लेप केसांना लावा. थोड्या वेळावे केस धुवा.