केसांमध्ये वाढलेला ‘कोंडा’ कायमचा दूर करायचा आहे का ? फक्त हे ‘4’ घरगुती उपाय करा, झटक्यात गायब होईल कोंडा

केसांमध्ये वाढलेला ‘कोंडा’ कायमचा दूर करायचा आहे का ? फक्त हे ‘4’ घरगुती उपाय करा, झटक्यात गायब होईल कोंडा

हिवाळा सुरू झाला असून आता हळूहळू वातावरणात गारवा जाणवत आहे. थंडीच्या दिवसात सगळ्यात कॉमन जाणवणारी समस्या म्हणजे केसांचा कोरडेपणा आणि कोंडा होणं. तुम्हाला कल्पना नसेल पण जास्त कोंडा असणं हीच बाब पुढे केसांच्या गळण्यासाठी कारणीभूत ठरते. कारण कोंडा जास्त झाला तर अनेकदा चांगल्या शॅम्पूने धुतलं तरी निघत नाही आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा कसा दूर करायचा तसंच केस गळण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवायची याबाबत सांगणार आहोत.

तेलाने मालिश – आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. यामुळे स्काल्पचा ड्रायनेस दूर होईल आणि पोषक तत्व केसांसाठी फायदेशीर ठरतील. याशिवाय तुम्ही खोबरेल तेलाने सुद्धा मालिश करू शकता. मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं परिणामी केस गळणं थांबतं. तसंच खोबऱ्याच्या तेलामध्ये टी-ट्री ऑइल एकत्र करा आणि स्काल्पला लावून मालिश करा. अर्धा तास किंवा संपूर्ण रात्र तसचं ठेवा. त्यानंतर केमिकल्स कमी असणाऱ्या शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ करा.

सोडा, लिंबू – एका बाउलमध्ये 3 चमचे बेकिंग सोडा पावडर घ्या. त्यामध्ये 3 चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पला लावा. हा उपाय केल्यानं स्काल्पवरील घाण दूर होण्यास तसंच केस मजबूत होण्यास मदत होईल.

लाकडी कंगवा – केसातील कोंडा कमी करण्यास लाकडी कंगव्याचा उपयोग होतो. लाकडी कंगव्यामुळे डोक्यावरील त्वचेमध्ये निर्माण होणारा तेलकटपणा कमी होतो. परिणामी कोंडा कमी होण्यास मदत होते.

रोज केस धुणं टाळा – हिवाळ्यात दररोज केस धुण्यास टाळा. दररोज केस धुण्यामुळे टाळूमध्ये असलेले नैसर्गिक तेल कोरडे होईल आणि यामुळे आपले केस ओलावाशिवाय निरोगी आणि निर्जीव दिसतील. कोरड्या केसांपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवा.

शक्यतो डोकं झाकून ठेवा – हिवाळ्याच्या महिन्यांत केस शक्य तितके झाकून ठेवा, अन्यथा केस कोरडे होऊ शकतात. आंबाडा किंवा वेणी घालून डोक्यावर स्कार्फ वापरा. दुपारी डोके आणि संपूर्ण शरीर सूर्यप्रकाशापासून वाचवता येईल. याची काळजी घ्या.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral