रोजच्या आहारामध्ये ‘या’ वस्तूचा वापर करा.. होतील चमत्कारिक फायदे..

रोजच्या आहारामध्ये ‘या’ वस्तूचा वापर करा.. होतील चमत्कारिक फायदे..

कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

कोरफड ही एकाच ॲलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा “खरी कोरफड” होय. मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित “कोरफड व्हेरा” प्रमाण मानली जाते. ॲलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते. कोरफडीचे फायदे असे..

1) वजन घटवणे – अनेक लोकांना वजन वाढीची समस्या असते. अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. मात्र, कोरफडीचा रस घेऊन आपण वजन नियंत्रणात ठेवू शकता.

2) सर्दी खोकला – अनेकांना हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये सर्दीचा त्रास होतो. अशा लोकांनी कोरफडीचा रस घेतल्यास सर्दी खोकल्यावर नियंत्रण मिळवता येते.

3) संधिवात – अनेक महिलांमध्ये संधिवाताची समस्या असू शकते. अनेक महिला या आयुर्वेदिक उपाय करतात. मात्र, त्यांना यामध्ये अधिक यश मिळत नाही. कोरफडीचा रस घेतल्यास संधीवातावर देखील नियंत्रण मिळवता येऊ शकते.

4) पचन संस्था – साध्यचा जमान्यामध्ये अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात. त्यामुळे त्यांचे पचन क्रिया बिघडते. अशा लोकांनी कोरफडीचा रस घ्यावा. त्यामुळे पचन क्रिया ही सुरळीत राहते.

5) योनी संक्रमण – अनेक स्त्रियांना योनी जवळ इन्फेक्शन झाल्याने त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे महिलांनी त्या जागेवर कोरफडीचा रस लावल्यास इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

6) दातांचे आजार – अनेकाना दात किडणे समस्या असते. अशा लोकांनी कोरफडीचा रस घेतल्यास किंवा दातावर कोरफडीची मालिश केल्यास दात दुखणे थांबते.

7) रोग प्रतिकारशक्ती – कोरफडीचा रस पिल्याने तुमच्यातील रोगप्रतिकारशक्ती ही कमालीची वाढते. त्यामुळे आठवड्यातून कोरफडीचा रस एकदा तरी घेतला पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral