भरकार्यक्रमात गायक ‘कैलास खेर’ यांच्यावर हल्ला

भरकार्यक्रमात गायक ‘कैलास खेर’ यांच्यावर हल्ला

अल्ला के बंदे, तू जाने ना यासह बाहुबली चित्रपटातील कोण हे वो आणि इतर चित्रपटात आपला बहारदार आवाज देणारे सुफी गायक कैलाश खेर यांच्या आवाजाचे चाहते अनेक आहेत. कैलाश खेर हे अनेकदा स्टेज शो देखील करत असतात. स्टेज शो करून ते आपल्या चहात्यांना मंत्रमुग्ध करत असतात. कैलाश खेर यांचे बाहुबली चित्रपटातील सगळे गाणे हे खूप लोकप्रिय ठरले आहेत.

या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. कैलाश खैर हे आपल्या वेगळ्या बहारदार आवाजासाठी जाणल्या जातात. आता कैलास खैर यांच्यावर कर्नाटकामध्ये हल्ला करण्यात आला आहे. एका संगीत कार्यक्रमा दरम्यान कैलाश खैर यांचा स्टेजवर परफॉर्म सुरु असतानाच दोन मुलांनी त्यांच्यावर बाटल्या फेकल्या. घटनेनंतर पोलिसांनी दोन हल्लेखोरांला ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकामध्ये तीन दिवसीय हंपी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 29 जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालला. या महोत्सवादरम्यान अनेक गायकांना येथे बोलविण्यात आले आहे. यामध्ये कैलाश खेर यांचाही समावेश आहे. कैलाश खेर यांनी या कार्यक्रमादरम्यान अनेक गाणे गायले. मात्र, काही प्रेक्षकांनी कन्नड गाण्याची मागणी केली. त्यानंतर ते हिंदी गाणी गाऊ लागले.

त्यावेळेस दोन जणांनी त्यांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यामध्ये सुदैवाने कैलाश खेर याला काही दुखापत झाली नाही. मात्र या बाटल्या का फेकल्या याचा तपास देखील आता पोलीस करत आहेत. एकूणच कैलाश खैर यांना यामध्ये काही दुखापत झाली नाही. मात्र, असा कलाकारांचा अपमान करू नये, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Team Hou De Viral