‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत घडणार धक्कादायक घटना, कूकीला जाणार ‘देवाघरी’

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत घडणार धक्कादायक घटना, कूकीला जाणार ‘देवाघरी’

सध्या छोट्या पडद्यावर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेचा टीआरपी प्रचंड वाढलेला आहे. गेल्या आठवड्यात बदल पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ही मालिका लवकरच बंद होणार असे देखील संकेत काही दिवसापूर्वी मिळत होते.

या मालिकेमध्ये अपूर्वा आणि शशांक यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत कानिटकर कुटुंबीय दाखवण्यात आलेले आहे, तर शशांकच्या आयुष्यामधील नेत्रा हीदेखील ढवळाढवळ करत असल्याचे सध्या दिसत आहे.

या मालिकेमध्ये शशांक याची भूमिका अभिनेता चेतन वडनेरे याने साकारली आहे, तर ऋतुजा धारप हिच्यासोबत चेतन याचे प्रेम प्रकरण सुरू असल्याचे त्याच्या खाजगी आयुष्यात बोलले जाते. मालिकेत नेत्रा आता शशांकच्या आयुष्यात ढवळाढवळ करताना त्याला जाब विचारते आणि म्हणते की, तू मला फसवलं माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक केले.

त्यावर शशांक म्हणतो, की माझे अपूर्वा वरच प्रेम आहे. या मालिकेमध्ये सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात या मालिकेत शरद पोंक्षे यांनी देखील काम केले आहे. या मालिकेमध्ये लीना भागवत कदम आणि अभिनेता मंगेश कदम यांनी देखील काम केले आहे. तर या मालिकेमध्ये ज्ञानदा रामतिर्थकर आपल्याला अपूर्वाच्या भूमिकेत काम करताना दिसत आहे.

या मालिकेत तिने अतिशय जबरदस्त काम केले आहे. शितल कुलकर्णी यांनी देखील या मालिकेत चांगले काम केले आहे. नम्रता प्रधान हीची भूमिका प्रेक्षकांना आवडते. सुप्रिया पठारे यांनी या मालिकेत बाईची भूमिका साकारली आहे, तर सारिका नवनाथ हे तिने या मालिकेत बाबी आत्याची भूमिका साकारली आहे.

स्वप्निल काळे यांनी देखील या मालिकेत जबरदस्त असे काम केले आहे. त्याने अमेय ही भूमिका साकारली आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेत होळी आणि रंगपंचमी सण उत्साहात साजरा झाला. यापुढे मालिकेत काय घडणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मालिकेत काही भागात अपर्णा आणि कुकी यांचा लग्नाचा वाढदिवस असेल.

शशांक आणि अप्पू दोघांच्या लग्नाचे वाढदिवसाच धमाकेदार प्लॅनिंग आखतील. यासाठी शशांक आणि अपूर्वा शॉपिंग करायला जातील. याच वेळी कुक्की हा चक्कर येऊन खाली कोसळेल. सर्वांना धक्का बसला असेल. शशांक आणि अपूर्वा शॉपिंग करून घरी येतील. ही गोष्ट समजताच त्या दोघांनाही काळजी वाटेल.

डॉक्टरांना बोलावण्यात येईल. कुकी याला गंभीर आजार झालेला असतो. त्यामुळे त्याची लवकरात लवकर सर्जरी करावी लागणार असते. या सर्जरीला लागणारा खर्च खूप जास्त असतो. कानेटकर कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम नसते. कानेटकर सुद्धा टेन्शन मध्ये असतील. या वेळी अपूर्वा पुढाकार घेईल.

ती स्वतःचे दागिने विकेल आणि त्यातून मिळणारी रक्कम ऑपरेशनसाठी देईल. कानेटकरांं ना आपूर्वाचा अभिमान वाटेल. त्यानंतर कुकीला सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात येईल मग पुढे काय होणार हे लवकरच कळणार आहे.

Team Hou De Viral