‘तुझ्यात जीव रंगला’ मधला लाडू दिसणार आता या चित्रपटात… जाणून घ्या कुठला आहे तो..

गेल्या काही वर्षापासून मराठी मालिका या प्रचंड गाजत आहेत. अनेक कलाकारांना मराठी मालिकांची भुरळ पडत आहे. पूर्वीच्या काळी मालिकांमध्ये काम करणे हे चांगले समजले जात नव्हते. कारण चित्रपटात काम करणे हे उच्च दर्जाचे समजले जायचे. त्यामुळे चित्रपटात काम करून मालिकांत काम करणे त्यावेळी कुणालाही आवडत नसल्यामुळे आपला दर्जा खालावेल, अशी भीती अनेकांना होती.
मात्र, बदलत्या काळानुसार आता अनेक दिग्गज कलाकार देखील मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. याचे कारणही व्यावसायिक असे आहे. कारण एक एपिसोड मधून जवळपास एक लाख रुपये कलाकारांना मिळत असतात. तसेच कलाकारांच्या दर्जानुसार देखील त्यांना मानधन मिळत असते. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा मालिकांकडे वळवला आहे.
त्यामुळे मालिकांमध्ये काम करतानाचा फायदा असा आहे की, मालिकाही अनेक वर्ष सुरु असते. त्यामुळे कलाकारांचे मानधन देखील वाढतच राहते आणि त्यांना ठराविक उत्पन्न मिळते. मात्र, चित्रपटाचे याउलट असते. चित्रपटात काम केले की एक ठराविक रक्कम मिळते. त्यानंतर तुम्हाला काहीही मिळत नाही. मात्र, मालिका चार वर्षे चालली तर तुम्हाला ठराविक महिन्याला मानधन मिळून तुमचा आर्थिक स्तर हा उंचावत असतो.
आजवर अनेक दिग्गज अभिनेत्रीनी मराठीत काम केले आहे तेजश्री प्रधान हिचे उदाहरण घ्याव लागेल. होणार सुन मी या घरची या मालिकेत तिने काम केले. त्यानंतर तिला चित्रपटात देखील काम मिळाले. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या एका मालिकेमध्ये डॉक्टर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ झळकत आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे.
मात्र, असे असले तरी ते मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यामुळे मालिकांना आता चांगले दिवस आले आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर सुरू झालेली तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रचंड गाजलेली आहे. ही मालिका अद्यापही सुरू आहे. या मालिकेमध्ये हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी भूमिका साकारल्या होत्या. अक्षय हिने साकारलेली पाठक बाई ही सर्वांनाच आवडली होती.
तिला त्यानंतर अनेक मालिकांच्या ऑफर मिळत होत्या. हार्दिक याने साकारलेला रांगडा राणा दा हा सर्वांच्याच लक्षात राहिला. यामध्ये वहिनी साहेबांची भूमिका देखील खूप गाजली होती.या मालिकेमध्ये एक छोटासा मुलगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचे मालिकेत नाव लाडू असे होते. हा लाडू सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. या लाडू चे खरे नाव राजवीर सिंह असे आहे. मात्र, गेल्या काही महिन्यापासून तो मालिकेतून आता गायब झाला आहे.
लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव भारत माता की जय असे आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत हेमांगी कवी यांची भूमिका असणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती आशिष अग्रवाल करत आहेत.
या चित्रपटामध्ये राजवीर यांच्यासोबतच मंगेश देसाई, शशांक शेंडे यांच्या भूमिका असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची कथा ही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता आहे.