हिट चित्रपट देऊन सुद्धा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे करिअर बुडाले, नाव जाणून तुम्ही हैराण व्हाल

अभिनेत्री ग्रेसी सिंगने अनेक सुपरस्टार्ससोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीचा डेब्यू चित्रपट सुपरहिट ठरला पण तरीही, ही अभिनेत्री खूप लवकर हिंदी सिनेमाच्या जगातून गायब झाली. अभिनेता आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटातुन तिला बरीच ओळख मिळाली.’लगान’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणार्या ग्रेसी सिंगबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
या अभिनेत्रीचा जन्म 20 जुलै 1980 रोजी दिल्ली येथे झाला होता. तिच्या आई-वडिलांची इच्छा मुलगी डॉक्टर किंवा अभियंता व्हावे अशी होती, परंतु ग्रेसीला शास्त्रीय नर्तक व्हायचे होते. त्यांनी भरतनाट्यम आणि ओडिसी डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे जेव्हा ‘लगान’ चित्रपटाची तिची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली तेव्हा अभिनेत्रीला ‘हाथोन पे ऐसी बात’ या गाण्यावर नाचण्यास सांगितले गेले.
तिच्या नृत्य कौशल्यामुळे आणि अभिनयामुळे तिला बऱ्याच चित्रपटांची ऑफर मिळाली. जेव्हा ग्रेसीला लगान या चित्रपटामध्ये अभिनेत्री होण्याची संधी मिळाली तेव्हा ती भूमिकेत इतकी मग्न झाली की तिचे शूटच्या आसपासच्या लोकांशीही बोलायचे देखील लक्षात नव्हते राहत. या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटविश्वात जबरदस्त एंट्री घेतली, पण हळूहळू तिची कारकीर्द बी-ग्रेड चित्रपट आणि दूरचित्रवाणीकडे वळली.
त्यानंतर ग्रेसीने लवकरच बॉलिवूड इंडस्ट्री सोडली.अभिनेत्री ग्रेसीने अभिनेता अजय देवगणसोबत प्रकाश झाच्या गंगाजलमध्ये काम केले होते, परंतु या चित्रपटातील तिचे पात्र खूपच लहान होते, ज्याचा तिला त्रास सहन करावा लागला. त्यानंतर अभिनेत्रीने संजय दत्तसोबत 2004 मध्ये ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ मध्ये काम केले.
चित्रपटांमधील तिची न वाढणारी व्याप्ती पाहता ग्रेसीने लहान पडद्यावर प्रवेश केला. ‘संतोषी मां’ या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु आता ही अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून खूप दूर आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.